Homeताज्या घडामोडीRamdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या गाडीचा साताऱ्यात अपघात

Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या गाडीचा साताऱ्यात अपघात

Subscribe

केंद्रीय मंत्री आणि रिपाई पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. साताऱ्यातील वाई परिसरात गुरूवारी हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. रामदास आठवले यांची कार एका कंटेनरला जाऊन धडकल्याने अपघात झाला.

सातारा : केंद्रीय मंत्री आणि रिपाई पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. साताऱ्यातील वाई परिसरात गुरूवारी हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. रामदास आठवले यांची कार एका कंटेनरला जाऊन धडकल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातात रामदास आठवलेंना कोणतीही दुखापत झालेली नाही. अपघातानंतर रामदास आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईत दाखल झाले. (union minister ramdas athawale car accident near wai satara)

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत होते. त्यावेळी रामदास आठवले यांची गाडी साताऱ्यातील वाई परिसरात एका कंटेनरला जाऊन धडकली. या धडकेत कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताबाबत रामदास आठवलेंनी माहिती दिली.

रामदास आठवलेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, “मी काल महाडला होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनासाठी मी महाडमध्ये होतो. रात्री 9 वाजेपर्यंत मी महाडमध्ये होतो. त्यानंतर मी महाबळेश्वरमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी गेलो. त्याठिकाणी माझा मुक्काम होता. त्यानंतर मी वाईमध्ये आलो. वाईमधून मुंबईला निघालो तेव्हा 6:15 वाजता खंडाळा बोगद्यात एका गाडीचा पंक्चर काढत होते. त्यावेळी 2 कंटेनर तिकडे थांबले होते. तेव्हा आमची पोलिसांची गाडी कंटेनरला ठोकली. त्यानंतर आमच्या ड्रायव्हरने ब्रेक दाबला. पण आमची गाडी ठोकली. यामध्ये आमच्या गाडीच्या इंजिनचे नुकसान झाले. माझ्याबरोबर माझी पत्नी सीमा आणि तिची आईही गाडीत होते. मात्र, आम्ही सगळे सुखरुप आहोत”, असे रामदास आठवले यांनी सांगितले.


हेही वाचा – Electoral Bonds: अखेर इलेक्टोरल बाँडचे संपूर्ण तपशील जाहीर; SBI चे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र