घरताज्या घडामोडी'गोपीनाथ मुंडे राजकारणात नसते तर आम्ही गावाच्या पारावर परिपाठ म्हणत बसलो असतो'

‘गोपीनाथ मुंडे राजकारणात नसते तर आम्ही गावाच्या पारावर परिपाठ म्हणत बसलो असतो’

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून खासदार प्रीतम मुंडे यांना डावलून रावसाहेब दानवे आणि डॉक्टर भागवत कराड यांना मंत्रीपद दिल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा सुरू आहे. काल, गुरुवारी जालनातील भाजप जन आशीर्वाद यात्रे दरम्यान हे दिसून आले. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी जन आशीर्वाद यात्रेत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे फोटो दाखवून विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. याच अनुषंगाने मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे का? असा प्रश्न केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विचारण्यात आला. याचचे उत्तर देताना रावसाहेब दानवे म्हणाले की, ‘दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे राजकारणात नसते तर आम्ही आमच्या गावाच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो.’

भाजप कार्यकर्त्यांकडून गुरुवारी जालन्यातील जन आशीर्वाद यात्रेसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. याच दरम्यान पाच ते सहा जणांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो हातात घेऊन ‘गोपीनाथ मुंडे अमर रहे’ आणि ‘भगवानगडाची गद्दारी करणाऱ्यांना गद्दारी पचत नाही’ अशा प्रकारची घोषणाबाजी केली. तसेच त्यांनी पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ देखील घोषणा केल्या.

- Advertisement -

या जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये मुंडे समर्थकांमध्ये नाराजी वातावरण पसरले नाही असे स्पष्टपणे सांगितले. ज्या लोकांनी घोषणाबाजी केली ते भाजपचे असतील असे मला वाटत नाही. आमच्यासारख्या राजकीय सारख्या पक्षाच्या कार्यक्रमात कोणीही येऊन काहीही करू शकतं, असं स्पष्ट केलं.


हेही वाचा – रावसाहेब दानवेंची राहुल गांधींबाबत बोलताना जीभ घसरली, भर सभेत जहरी टीका

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -