Eco friendly bappa Competition
घर क्राइम केंद्रीय मंत्र्यांच्या आईला भररस्त्यात चोरांनी लुटले, सुप्रिया सुळेंनी गृहमंत्र्यांवर साधला पुन्हा निशाणा

केंद्रीय मंत्र्यांच्या आईला भररस्त्यात चोरांनी लुटले, सुप्रिया सुळेंनी गृहमंत्र्यांवर साधला पुन्हा निशाणा

Subscribe

मुंबई : केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईंना भररस्त्यात चोरांनी लुटल्याची घटना घडली आहे. नाशिक शहरातील आरटीओ रोड परिसरात ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत राज्यातील कायदा सुव्यवस्थेकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

भारती पवारांच्या आईला दुचारीवरून आलेल्या दोन अज्ञान तरुणांनी गळ्यातील सोन्याची माळ हिसकावली. या प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ” माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की कृपया आपण कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत गांभिर्याने कार्यवाही करावी”, अशी विनंती ट्वीट राज्याचे देवेंद्र फडणवीसांना केले आहे.

- Advertisement -

सुप्रिया सुळे ट्वीटमध्ये म्हणाल्या, “राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गॄहखाते निष्क्रिय असल्याने हि स्थिती उद्भवली असून गुन्हेगार निर्ढावले आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईंच्या गळ्यातील चेन चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेल्याची घटना घडली. यामध्ये सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही. देव त्यांना निरोगी, दिर्घायुष्य देवो. परंतु या घटनेमुळे जर मंत्र्यांचे नातेवाईक देखील सुरक्षित नाहीत हे उघड झाले आहे. त्यांची हि स्थिती तर सर्वसामान्य जनतेचे काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की कृपया आपण कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत गांभिर्याने कार्यवाही करावी.”

- Advertisement -

हेही वाचा – ‘स्वत: चा प्रचार करण्यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रम’; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशा

काय आहे प्रकरण

भारती पवार यांच्या आई भाजी खरेदी करण्यासाठी घरापासून काही अंतरावर असलेल्या बाजारात गेल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी भारती पवारांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावली.

हेही वाचा – गृहमंत्रालय झेपत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा; सुप्रिया सुळेंचं विधान

संभजीनगरातील राड्यावर सुळेंनी मागितला राजीनामा

यापूर्वी सुप्रिया सुळेंनी छत्रपती संभाजीनगर परिसरात झालेला राड्याप्रकरणी सत्ताधाऱ्यांवर गृहमंत्र्यांवर टीका केली आहे. राज्यात झालेली दंगल ही गंभीर बाब आहे. त्यामुळे राज्यात कायदा, सुव्यवस्था राखणं जर जमत नसेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

- Advertisment -