घरताज्या घडामोडीदेशाच्या विकास प्रक्रीयेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनन्यसाधारण महत्त्व : महापालिका आयुक्त

देशाच्या विकास प्रक्रीयेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनन्यसाधारण महत्त्व : महापालिका आयुक्त

Subscribe

लोकशाही बळकट करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना संविधानिक मान्यता देण्यात आली आहे. देशाच्या विकास प्रक्रीयेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

मुंबई : लोकशाही बळकट करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना संविधानिक मान्यता देण्यात आली आहे. देशाच्या विकास प्रक्रीयेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचप्रमाणे लोकशाहीचे बळकटीकरण करण्याकरिता सर्व क्षेत्रामध्ये नागरिकांचा सक्रीय सहभागही अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई महापालिकेचे आयुक्त व प्रशासक इकबाल चहल यांनी केले आहे. (Unique importance of local self-government bodies in the development process of the country says bmc Commissioner)

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी आयुक्तांनी मुंबईकरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत वरीलप्रमाणे प्रतिपादन केले.

- Advertisement -

मातृभूमीला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याकरिता झालेल्या स्वातंत्र्य संग्रामात ज्या देशभक्तांनी आपले सर्वस्व पणाला लावले, अशा सर्व थोर स्वातंत्र्यसेनानींना आयुक्तांनी अभिवादन केले. तसेच भारतमातेच्या संरक्षणार्थ अविरत कार्यरत असणाऱया भूदल, नौदल आणि वायुदल हयांना आदरपूर्वक मानवंदना दिली.

यावेळी, आयुक्त यांनी, महापालिकेतर्फे मुंबईकरांना पुरविण्यात येत असलेल्या आरोग्य, घनकचरा, शिक्षण, कोस्टल रोड, प्रस्तावित मलजल प्रक्रिया केंद्र, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी सेवा आणि मुंबईतील सुशोभिकरणाची कामे आदी सेवसुविधांबाबत थोडक्यात माहिती दिली. त्याचप्रमाणे, मुंबई महापालिका कोरोनाच्या चारही लाटा थोपविण्यात यशस्वी झाली असून याबद्दल वेळोवेळी जागतिक आरोग्य संघटनेने मुंबई महापालिकेचे कौतूक केले, अशी माहितीही आयुक्त यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

तसेच, कोरोनाच्या लाटेला रोखण्यात जे यश पालिकेला आले, ते यश मुंबई महापालिका प्रशासन, महापालिकेचे डॉक्टर्स, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, बेस्टचे सर्व अधिकारी/ कर्मचारी यांचे आहे, असे आयुक्त चहल यांनी आवर्जून सांगितले. त्याचप्रमाणे, मुंबई महापालिकेने केलेल्या सूचना व आवाहनाला मुंबईकर नागरिकांनी चांगल्या प्रतिसाद दिल्यामुळे हे यश मिळविणे शक्य झाले असल्याचे आयुक्त यांनी सांगितले. मात्र कोरोनाशी निकराचा लढा देताना मृत्युमुखी पावलेल्या मुंबई महापालिका व बेस्टच्या कर्मचाऱयांचा उल्लेख करून त्यांच्या प्रति शोक व्यक्त करीत आयुक्त यांनी श्रध्दांजली अर्पित केली.

संसदीय लोकशाहीचा पुरस्कार करणाऱया भारतीय राज्यघटनेचा आपण सर्वांनी आदर राखला पाहिजे. राज्य घटनेत नमूद केलेल्या हक्कांप्रती आपण सर्वचजण सजग आहोत. त्याचबरोबर कर्तव्यपालन करुन आणि वैज्ञानिक दृष्टीकोन अंगिकारुन आपण सर्वजण उत्तम नागरिक म्हणूनही आपले जीवन व्यतीत कराल, अशी अपेक्षाही आयुक्त इकबाल चहल यांनी यावेळी व्यक्त केली.


हेही वाचा – ‘मविआ’चा भाग व्हायचे असेल तर, प्रमुख स्तंभांवर बोलू नये; राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -