Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र चिमण्यांची संख्या वाढविण्यासाठी अनोखा उपक्रम

चिमण्यांची संख्या वाढविण्यासाठी अनोखा उपक्रम

Subscribe

मुंबईत चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आता १ मे महाराष्‍ट्र दिनाच्‍या निमित्‍ताने प्रमोद माने यांच्‍या 'स्पॅरो शेल्टर' या संस्‍थेमार्फत पर्यावरणपुरक असे चिमणीचे शिल्‍प बनवण्‍यात आले आहे.

मुंबईत चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आता १ मे महाराष्‍ट्र दिनाच्‍या निमित्‍ताने प्रमोद माने यांच्‍या ‘स्पॅरो शेल्टर’ या संस्‍थेमार्फत पर्यावरणपुरक असे चिमणीचे शिल्‍प बनवण्‍यात आले आहे. त्‍यावर चिमण्‍यांची संख्‍या कमी होण्‍याची कारणे व त्‍यावरील उपययोजनांबाबत माहिती देण्‍यात आली आहे. हे शिल्प मुंबईतील इतर उद्यानात बनवण्यात येणार असून त्याद्वारे मोठी जनजागृती करण्यात येणार आहे. ( Unique initiative to increase the number of sparrows Shelter or organization )

यासंदर्भातील माहिती पालिका उद्यान खात्याचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेच्‍या उद्यान विभागामार्फत वृक्ष संवर्धन व जैव विविधतेचे जतन करण्‍यासाठी वेळोवेळी जनजागृती करण्‍याच्‍या हेतूने विविध उपक्रम राबविण्‍यात येतात. त्‍यामध्‍ये वृक्ष संजीवनी योजना व असे अनेक उपक्रम यापूर्वीदेखील राबवण्‍यात आलेले आहेत. भारतातील ७५ शास्‍त्रज्ञांची परिषद आयोजित करून त्‍यांच्‍या मदतीने मुंबईत हिरवळ वाढवण्‍यासाठी तज्‍ज्ञांचे मत जाणून घेण्‍यात आले. जागतिक चिमणी दिवसाच्‍या निमित्‍ताने नेचर फॉरएव्‍हर सोसायटीचे अध्‍यक्ष मोहम्‍मद दिलावर यांचे व्‍याख्‍यान वि.जी.भो. उद्यानात आयोजित करण्‍यात आले होते. त्यास चांगला प्रतिसाद लाभला होता.

- Advertisement -

याचाच पुढचा भाग म्‍हणून १ मे महाराष्‍ट्र दिनाच्‍या निमित्‍ताने प्रमोद माने यांच्‍या ‘स्पॅरो शेल्टर’ या संस्‍थेमार्फत पर्यावरणपुरक असे चिमणीचे शिल्‍प बनविण्‍यात आले आहे. त्‍यावर चिमण्‍यांची संख्‍या कमी होण्‍याची कारणे व त्‍यावरील उपययोजनांबाबत माहिती देण्‍यात आली आहे.

( हेही वाचा: World Asthma Day : ऑफिसमध्ये बसूनही होऊ शकतो दमा… )

- Advertisement -

१ मे महाराष्‍ट्र दिनाचे औचित्‍य साधून याच दिवसापासून उन्‍हाळयाच्‍या सुट्टीनिमित्‍त मु‍ंबईतील काही निवडक म्‍हणजेच ज्‍या उद्यानांमध्‍ये पर्यटकांची जास्‍त प्रमाणात वर्दळ असते अशा उद्यानांमध्‍ये हे शिल्‍प आळीपाळीने पर्यटकांसाठी ठेवण्‍यात येणार आहे. याची सुरूवात दादरच्या नारळी बाग येथून करण्यात आली आहे. उन्‍हाळी सुट्टीनिमित्‍त लहान मुलांमध्‍ये चिमण्‍यांविषयीची जिज्ञासा जागृत करण्‍याच्‍या हेतूने हे शिल्‍प ठेवण्‍यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्‍या उद्यान विभागाचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

- Advertisment -