घरताज्या घडामोडीविविध मागण्यांसाठी अकृषी विद्यापीठ, कॉलेज कर्मचाऱ्यांची बेमुदत संपाची हाक

विविध मागण्यांसाठी अकृषी विद्यापीठ, कॉलेज कर्मचाऱ्यांची बेमुदत संपाची हाक

Subscribe

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. 2 फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाणार आहे. अनेकदा निवेदने देण्यात आली असून, बैठका घेण्यात आल्या.

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. 2 फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाणार आहे. अनेकदा निवेदने देण्यात आली असून, बैठका घेण्यात आल्या. शिवाय, आंदोलनेही करण्यात आली. मात्र तरीही अद्याप मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. (university college employees on indefinite strike from February 2 boycott also on the conduct of examinations)

मागील तीन वर्षांपासून अकृषी विद्यापीठ, कॉलेजच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्या निवेदनानुसार, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, सातव्या आयोगाप्रमाणे वेतन, आश्वासित प्रगती योजनायासह विविध मागण्यांसाठी संप करण्यात येणार आहे. तसेच, प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी अनेकदा पाठपुरावा केला, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे देखील यावेळी निवेदनात म्हटले आहे. याबाबतचे निवेदन औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिवांना देण्यात आल्याची माहिती मिळते.

- Advertisement -

राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त समितीने आयोजित केलेल्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार, या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 2 फेब्रुवारीपासून राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकून या आंदोलनाची सुरुवात करण्याचा निर्णय झालेला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबत 6 जानेवारी रोजी बैठक झाली होती.


हेही वाचा – प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने वेधले सर्वांचे लक्ष

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -