घरताज्या घडामोडीविद्यापिठाच्या परीक्षा होणारच - उदय सामंत

विद्यापिठाच्या परीक्षा होणारच – उदय सामंत

Subscribe

रविवारी दहावीचा भूगोलाचा पेपर आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी घेतला. त्यानंतर विद्यापीठांच्या इतर परीक्षा रद्द झाल्या, असं वातावरण निर्माण झालं होतं.

दहावीचा भूगोल पेपर आणि नववी-अकारावीच्या परिक्षा रद्द झाल्या असल्या तरी कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयाच्या परिक्षा रद्द झालेल्या नाहीत, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. या परिक्षा घेण्यासंबंधी कुलगुरुंची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्यपालांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. रविवारी दहावीचा भूगोलाचा पेपर आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी घेतला होता. त्यानंतर विद्यापीठांच्या इतर परीक्षा रद्द झाल्या, असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

काय म्हणालेत नेमकं उदय सामंत

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही. तसेच परीक्षांसंबंधी कुलगुरुंची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती लवकरच अहवाल देईल. त्यानंतर त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर जर आणीबाणीची परिस्थितीत निर्माण झाल्यास भविष्यात परीक्षा कशा घ्याव्यात याबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने नववी आणि अकरावीच्या परीक्षा तसेच दहावीचा भूगोलाचा व कार्यशिक्षणाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून रविवारी घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नववी आणि अकरावीची परीक्षा न घेता वर्षभरातील प्रगती आणि मुल्यमापन करून त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने रविवारी घेतला, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -