मुख्यमंत्र्यांना 10 लाख पत्र पाठविण्यास उद्यापासून सुरुवात

या काळया विधेयकाला विरोध करत विद्यार्थी बांधवांना सोबत घेऊन १० लाख पत्र भारतीय जनता युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना पाठविणार आहे. तसेच ज्यांचा या काळया कायद्याला विरोध आहे त्यांनी 7745050111 या क्रमांकावर मिस् कॉल द्यावा असेही आवाहन देखील करण्यात आले आहे.

University Law Amendment Bill tomorrow Starting to send 10 lakh letters to the CM udhhav thackeray
University Law Amendment Bill tomorrow Starting to send 10 lakh letters to the CM udhhav thackeray

विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारे विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) महविकास आघाडी सरकारने मुद्दाम घाई घाईने पारित करून घेतले.या माध्यमातून प्र.कुलपती हे नवीन पद तयार करून कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत. विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. भविष्यात कुलगुरूंच्या नियुक्त्या ,विद्यार्थ्यांच्या पदव्या या सगळ्यातच आरोग्य सेवक भरती परीक्षा ,म्हाडा परीक्षा प्रमाणे करोडोंच्या भ्रष्टाचाराचे विषय करण्यासाठी यांना हे प्र.कुलपती पद पाहिजे का? हा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात आला आहे. त्यामुळे या काळया विधेयकाला विरोध करत विद्यार्थी बांधवांना सोबत घेऊन १० लाख पत्र भारतीय जनता युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना पाठविणार आहे. तसेच ज्यांचा या काळया कायद्याला विरोध आहे त्यांनी 7745050111 या क्रमांकावर मिस् कॉल द्यावा असेही आवाहन देखील करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या राखरांगोळी करणारे काळे विधेयक महाविकास आघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनात घाईघाईत रेटून नेले. कुलपती वर्षानुवर्ष ही यंत्रणा हाताळत होते त्यांचे आधिकार कमी करून ते अधिकारी शिक्षणमंत्र्यांना दिले जाणार आणि शिक्षकांना प्र. कुलपतीचा दर्ज दिला जाणार आहे. भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार राज्यातून समोर आले. भ्रष्टाचारातील अटक होणाऱ्यांची मालिका अद्याप सुरू आहे आणि सरकारला विद्यापिठचा विषय हातात घेऊन त्यातील आर्थिक मलिदा लाटायचा अशी यांची भावना आहे, अशी टीका भाजपच्या विक्रांत पाटील यांनी केली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे विद्यापिठातही भ्रष्टाचार सुरू होईल. ज्या पद्धतीने इतर परीक्षात भ्रष्टाचार झाले भविष्यात हे डिग्री देखील विकतील. कुलपती कुलगुरूंची निवड करायचे आता कुलगुरुंची निवड शिक्षणमंत्री करणार आणि कुलगुरूंच्या निवडीसाठी आर्थिक रॉकेट तयार होईल. हेच कुलगुरू बाबूगिरीमध्ये अडकणार. याचा परिणाम विद्यार्थी आणि प्राध्यापकांना भोगावे लागतील. त्यामुळे या काळ्या कायद्याचा निषेध आहे आणि या निषेधात अनेक विद्यार्थ्यांची आम्हाला साथ आहे, असे विक्रांत पाटील यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – २ दिवसांत आदिवासी भगिनींची वाट सुसह्य करू – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे