पदवीच्या प्रवेशात केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त जागा, मुंबई विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ९ ते २५ जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, तर प्रथम गुणवत्ता यादी ही २९ जून रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि संस्थांनी राबवणे बंधनकारक केले आहे.

mumbai university to ask colleges to reduce fees upto 30% and give a 100% waiver to students who have lost parents in the pandemic

राज्य मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर झाला असून मुंबई विद्यापीठाने पदवी प्रवेशाचे वेळापत्रकही जाहीर केले, मात्र अद्यापही सीबीएसई व आयसीएसई मंडळाकडून परीक्षांचे निकाल जाहीर झाले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता, मात्र या मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रत्येक महाविद्यालयात अतिरिक्त जागांना परवानगी देण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ९ ते २५ जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, तर प्रथम गुणवत्ता यादी ही २९ जून रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि संस्थांनी राबवणे बंधनकारक केले आहे. यामध्ये महाविद्यालयांनी, स्वायत्त महाविद्यालयांनी आणि संस्थांनी त्यांना मंजूर असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करायचे आहेत. सीबीएसई व आयसीएसई या मंडळाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.

त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे काय, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित करण्यात येत होता, मात्र मुंबई विद्यापीठाने या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत त्यांना दिलासा दिला आहे. सीबीएससी आणि आयसीएसई मंडळाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि संस्था यांनी दिलेल्या मुदतीत विद्यापीठाकडे अतिरिक्त जागांसाठी परवानगी मागावी आणि महाविद्यालयातील गुणवत्ता यादी कट-ऑफनुसार या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावे, असे निर्देश परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी महाविद्यालयांना दिले आहेत.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर सुरू असून हेल्पलाईन क्रमांक सुद्धा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.