कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात बॉम्ब – निनावी फोनने खळबळ

नवरात्रौत्सवाला आजपासून प्रारंभ झाला असून तब्बल दिड वर्षानंतर भक्तांसाठी मंदिरही खुली करण्यात आली . यामुळे भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात गर्दी केली होती. मात्र अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याने मंदिर थोड्यावेळासाठी बंद करण्यात आले. पण बॉम्ब ठेवल्याची अफवा असल्याचे स्पष्ट झाल्याने नंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा फोन गोव्यातील पणजी येथून आल्यानंतर मंदिरातील कर्मचारी आणि पोलिसांनी मंदिर पिंजून काढले. यामुळे काही वेळासाठी मंदिर परिसरात तणावाचे वातावरण होते. पण तपासात काहीही सापडले नाही. यामुळे ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भाविकांसाठी पुन्हा मंदिर खुले करण्यात आले.