घर महाराष्ट्र मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्ते यांना मारहाण

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्ते यांना मारहाण

Subscribe

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालयाबाहेर मारहाण ,हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण करण्यात आली आहे. आज मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर सुनावणी आहे. सुनावणीदरम्यान सदावर्ते यांना अज्ञातांकडून मारहाण करण्यात आली. मुंबई हायकोर्टाबाहेर ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देत त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोराचे नाव वैद्यनाथ पाटील असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यनाथ पाटील हा मूळचा जालनाचा असल्याचे देखील समजत आहे.

आज आहे सुनावणी 

मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये १६ टक्के आरक्षणाचा निर्णय विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये झाला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने आरक्षणाच्या नव्या कायद्याबरोबरच जुन्या कायद्याविषयीच्या दोन्ही बाजूंच्या प्रलंबित याचिकांवरही सुनावणी घेण्याचे ठरवले आहे. न्यायालयाच्या खोली क्रमांक ५२ मध्ये ही सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षण न्यायालयामध्ये टिकावं म्हणून न्यायालयामध्ये वकिलांची फौज उभी करू असं सरकारनं यापूर्वी स्पष्ट  केलेलं आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. मराठ्यांना १६ टक्के आरक्षण दिल्यानं एकूण आरक्षण हे ५२ टक्क्याच्या वरती जात असल्याचा युक्तीवाद यावेळी करण्यात आला आहे. डॉ. जयश्री पाटील यांनी अॅड. गुणरतन सदावर्ते यांच्यामार्फत मराठा आरक्षणाला हे आव्हान दिलेलं आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने आरक्षणाच्या स्थिगितीला नकार दिला होता. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -