घरमहाराष्ट्रतरुणीला खासगी फोटो आणि चॅट व्हायरल करण्याची धमकी

तरुणीला खासगी फोटो आणि चॅट व्हायरल करण्याची धमकी

Subscribe

आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीला आणि तिच्या होणाऱ्या पतीला एक अज्ञात व्यक्ती मेल आणि व्हाट्सअॅपवर फोटो आणि मॅसेज करून धमकावत असल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीचा विवाह जुळलेला आहे. परंतु, अज्ञात व्यक्ती त्यांच्या आयुष्यात संशय निर्माण करण्याचं काम करत आहे. तरुणीच्या आयुष्यातील खासगी फोटो आणि कथित चॅटचे स्क्रिनशॉट तिच्या होणाऱ्या पतीला पाठवत असल्याने पोलिसांकडे तरुणीने धाव घेतली आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

हिंजवडी आयटी हबमध्ये एका कंपनीत तरुणी संगणक अभियंता म्हणून काम करते. तिचा नोव्हेंबर महिन्यात साखरपुडा झाला आहे. परंतु, अवघ्या दहा दिवसांनंतर होणाऱ्या पतीला आणि स्वतः तरुणीला मेल आणि व्हॉटसॅपवर मॅसेज येत असून तरुणीच्या खासगी आयुष्यातील फोटो आणि केलेली चॅट पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, हा मेल कोठून आला याचा तांत्रिक तपास पोलीस करत आहेत. ज्या व्यक्तीवर संगणक अभियंता तरुणीचा संशय आहे तो सध्या बाहेरच्या देशात असतो. तर व्हाट्सअॅप नंबर हा परराज्यातील असल्याचं समोर आलं आहे.

- Advertisement -

ज्या व्यक्तीवर संशय आहे त्याच्या बरोबर संगणक अभियंता तरुणीचा विवाह होणार असल्याचे बोललं जातं होतं. त्यामुळे ते दोघे एकमेकांशी बोलत असत. मात्र काही कारणामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि दुसऱ्या व्यक्ती बरोबर तरुणीचा विवाह जमवण्यात आला. त्यानंतर अवघ्या दहा दिवसांत तरुणीला आणि होणाऱ्या पतीला खासगी आयुष्यातील फोटो आणि चॅटिंग हे मेल आणि व्हाट्सऍपवर पाठवण्यात येत आहे. तसेच हे फोटो काम करत असलेल्या ऑफिसमध्ये व्हायरल करण्याची धमकी ही देण्यात आली आहे. मी दिवस रात्र शिफ्टला काम करते. त्यामुळे सुरक्षा विषयी भीती वाटते आहे, असं तरुणीकडून पोलिसांना दिलेल्या अर्जात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -