घरताज्या घडामोडीराज्यात उद्यापासून 'शो टाईम' सुरू! चित्रपटगृह, नाट्यगृहांना राज्यसरकारची परवानगी!

राज्यात उद्यापासून ‘शो टाईम’ सुरू! चित्रपटगृह, नाट्यगृहांना राज्यसरकारची परवानगी!

Subscribe

राज्यात मिशन बिगीन अंतर्गत टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या गोष्टी सुरू करण्यात येत आहेत. या अंतर्गत राज्य सरकारने आता सगळ्यांना प्रतिक्षा अखेर संपवत सिनेमागृह आणि नाट्यगृहांना परवानगी दिली आहे. ५० टक्के क्षमतेने ही सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू करण्याची मुभा देण्यात आली असून यासाठी वेगळी नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासोबतच नाट्यगृहात खाद्यपदार्थ नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यासोबतच कंटेनमेंट झोन वगळता योगा क्लासेस, बॅडमिंटन, टेनिस खेळ सुरू करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. अनलॉकसंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीमध्ये ही परवानगी देण्यात आली आहे.

नव्या नियमावलीनुसार…

१. कंटेनमेंट झोनव्यतिरिक्त इतर भागांमध्ये क्रीडापटूंसाठी स्विमिंग पूल सुरू करण्यस परवानगी देण्यात आली आहे. ५ नोव्हेंबरपासून ही परवानगी असेल. यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना क्रीडा विभागाकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात येतील.

- Advertisement -

२. कंटेनमेंट झोनव्यतिरिक्त इतर भागांमध्ये योगा प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून यासंदर्भातली स्वतंत्र नियमावली जारी करण्यात येईल.

३. बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोअर शूटिंग रेंजला देखील परवानगी देण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून या ठिकाणांचा वापर करता येईल.

- Advertisement -

४. चित्रपटगृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्सना ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनव्यतिरिक्तच ही परवानगी असेल. सांस्कृतिक विभागातर्फे यासंदर्भातली नियमावली स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

unlock cinema hall theaters

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -