घरताज्या घडामोडीस्थायी समिती सभापतीपदी गणेश गिते यांची सलग दुसर्‍यांचा निवड

स्थायी समिती सभापतीपदी गणेश गिते यांची सलग दुसर्‍यांचा निवड

Subscribe

शिवसेनेने उमेदवारी अर्जच भरला नाही; मंगळवारी (दि. ८) निवडणुकीची औपचारिकता पूर्ण होणार

गेल्या दोन महिन्यांपासून स्थायी समिती सभापतीपदाचे स्वप्न पाहणार्‍या शिवसेनेने अखेरच्या क्षणी तलवार मॅन करीत तटस्थतेची भूमिका घेतली. त्यामुळे सभापती भारतीय जनता पक्षाचे गणेश गिते यांची सलग दुसर्‍यांदा बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी (दि.९) निवड जाहीर होण्याची औपचारिकता पार पडणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपचे आठ, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सात तर मनसेचा एक असे संख्याबळ होते. मनसेने शिवसेनेच्या बाजूने कल दर्शविला असता तर सारखे संख्याबळ झाले असते. मात्र मनसेने भाजपच्या बाजूने कल दिल्याने शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचीही तसदी घेतली नाही. सोमवारी (दि. ८) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत होती. या मुदतीत भाजपचे गणेश गिते यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निश्चित झाले आहे. निवडणुकीची औपचारिकता मंगळवारी (दि. ११) पार पडणार आहे. सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या निवडणूक सभेत गिते यांच्या सभापतीपदी निवडीची औपचारीक घोषणा केली जाईल.

मनसेची भाजपला साथ अन् सेनेला लाथ

बृहन्मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेने दिलेल्या चटक्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठींबा देऊन शिवसेनेचा दुसर्‍यांदा वचपा काढला आहे. स्थायीत शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसे एकत्र राहिली असती तर समसमान आठ-आठ असे बलाबल होऊन भाजपला चिठ्ठीतून रोखता आले असते. परंतु मनसेने आपले मत भाजपच्या झोळीत टाकत मॅजिक फिगरचा आकडा भाजपला पार करून दिल्याने शिवसेनेची कोंडी झाली. आता मंगळवारी(दि.८) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या निवडणूक सभेत गिते यांच्या सभापतीपदी निवडीची औपचारीक घोषणा केली जाईल.

- Advertisement -

निवडणुकीची ही आहे पार्श्वभूमी

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या याचिकेवरील उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थायी समितीतील भाजपचा एक सदस्य कमी होऊन शिवसेनेचा एक सदस्य वाढल्याने भाजपचे या समितवरील वर्चस्व संपुष्टात आले होते. त्यामुळे स्थायीच्या रुपाने महापालिकेची आर्थिक सत्ता काबीज करण्याचा मनसुभा विरोधक शिवसेनेने आखला होता. स्थायीतील सेनेचे सदस्य तथा महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी भाजपच्या सदस्य नियुक्तीवर आक्षेप घेत २४ फेब्रुवारी रोजीचा महासभेचा ठराव विखंडीत करण्याची मागणी केली होती. भाजपच्या चार सदस्यांचे राजीनामे न घेता महापौरांनी महासभेत केलेली नवीन सदस्यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा बडगुजर यांनी केला होता. यानंतर भाजपनेही शिवसेनेवर पलटवार करत सेनेचे गटनेेते विलास शिंदे यांनी महासभेपूर्वी सदस्यांची नावे बंद पाकीटात महापौरांना सादर न केल्याचे कारण देत बडगुजर यांच्यासह सेनेच्या तीन सदस्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली होती. महापौर सतीश कुलकर्णी यांनी यासंदर्भात लेखी पत्र आयुक्तांना सादर केल्याने स्थायी सभापतीपदाची निवड लांबणीवर पडते की काय, अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली होती. मात्र सेना-भाजपच्या परस्परविरोधी आक्षेपांना थारा न देता आयुक्त कैलास जाधव यांनी विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यांकडे सभापती निवडणुकीचा प्रस्ताव पाठविल्यानंतर गमे यांनी देखील कुठल्याही दबावाला बळी न पडता सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. दरम्यान, मनसेचे सलीम शेख यांनी भाजपला पाठींबा दिल्याने भाजपचे या समितीवर पुन्हा एकदा बहुमत झाले. त्यातच भाजपने या समितीवर माजी महापौर, माजी स्थायी सभापतींसारख्या ज्येष्ठ सदस्यांची नियुक्ती करत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केल्याने शिवसेनेची कोंडी झाली होती. त्यातच कॉँग्रेस, राष्ट्रवादीने शिवसेनेच्या कॅम्पमध्ये येण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक पराभवाचीच ठरणार होती. ही बाब हेरून शिवसेनेने या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सोमवारी(दि.८) भाजपचे गिते यांचाच अर्ज दाखल होऊ शकला. आता मंगळवारी(दि.८) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या निवडणूक सभेत गिते यांच्या सभापतीपदी निवडीची औपचारीक घोषणा केली जाईल.

 

स्थायी समिती सभापतीपदी गणेश गिते यांची सलग दुसर्‍यांचा निवड
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -