असंसदीय शब्दांवरून राष्ट्रवादी – काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

unparliamentary words tmc mp mahua moitra and shiv sena priyanka chaturvedi ncp congress took jibe on modi government

संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये शब्दांच्या वापराबाबत केंद्र सरकारकडून आज नव्या मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या, याशिवाय असंसदीय शब्दांची लिस्ट देखील केंद्राने दिली आहे. याच असंसदीय शब्दांच्या वापरवरून तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसकडून मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षासह काँग्रेसच्या खासदार महुआ मोईआ आणि शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी यावरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपवर निशाणा साधत ट्विटमध्ये लिहिले की, बसा. बसा. प्रेमाने बोला. लोकसभा आणि राज्यसभेच्या नवीन असंसदीय शब्दांच्या यादीत संघी शब्दाचा समावेश नाही. भाजप कसा भारताचा नाश करत आहे हे सांगण्यासाठी विरोधकांकडून वापरण्यात येणाऱ्या सर्व शब्दांवर बंदी घालण्याचे काम केंद्राने केले आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एका जुन्या मीमचा उल्लेख करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रियांकाने ट्विट केली की, करायचं तर काय करु, बोलायचं तर काय बोलू? ओन्ली वाह मोदी जी वाह! हा लोकप्रिय मिम आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरत आहे.

याशिवाय राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी देखील असंसदीय शब्दांवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तपासे यांनी ट्विट केले की, केंद्र सरकारला ज्या ज्या शब्दांपासून धोका संभवतो, ते सर्व असंसदीय जाहीर केलेत का? ठीक आहे! संसदेत नाही पण जनतेच्या दरबारात याच शब्दांनी तुमची ख्याती प्रसिद्ध आहे, हे लक्षात असू द्या . #समझनेवालेकोइशाराकाफी

तर काँग्रेस पक्षानेही आपल्या अधिकृत ट्विट अकाऊंटवरून केंद्रावर टीका केली आहे. जुमलाजीवी’ ना कोणापासून भीती आहे. जुमलाजीवी’ से किसको डर होगा- जिसने जुमले दिए हों। ‘जयचंद’ शब्द से कौन डरेगा- जिसने देश से धोखा किया हो। ये संसद में शब्द बैन नहीं हो रहे हैं, पीएम मोदी का डर बाहर आ रहा है।.

लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्द 2021 या शीर्षकाखाली अशा शब्द आणि वाक्यांची यादी तयार केली आहे, ज्यांना लोकसभा आणि राज्यसभेसह राज्यांच्या विधानसभांमध्ये असंसदीय घोषित करण्यात आलं होतं. या यादीत समाविष्ट शब्द आणि वाक्ये ‘असंसदीय अभिव्यक्ती’ या श्रेणीत ठेवण्यात आली आहेत. ज्या अंतर्गत स्प्रेडर, जयचंद, शकुनि, जयचंद, लॉलीपॉप, चांडाल चौकड़ी, गुल खिलाए, पिट्ठू असे शब्द चर्चेदरम्यान दोन्ही सभागृहात वापरता येणार नाहीत. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या नवीन पुस्तिकेनुसार, अशा शब्दांचा वापर सामान्य आचरणासाठी अशोभनीय मानला जाईल आणि सभागृहाच्या कामकाजाचा भाग होणार नाही.


संसदेत आता जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, जयचंद अशा डझनभर शब्दांवर बंदी; पाहा पूर्ण लिस्ट