घरमहाराष्ट्रबीडमध्ये नियोजनशून्य कारभार, पण डोकं लावून उंच केला जमिनीलगतचा पूल

बीडमध्ये नियोजनशून्य कारभार, पण डोकं लावून उंच केला जमिनीलगतचा पूल

Subscribe

Beed Bridge | औरंगाबाद – रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्याकरता उड्डाणपूल बांधण्यात आला. मात्र, उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदार आणि अभियंताला उड्डाणपुलाची उंची कमी असल्याचं लक्षात आलं. आता आपली चूक झाकण्यासाठी उड्डाणपुलाखालील रस्ता खोदला जात आहे. हा प्रकार घडला आहे औरंगाबादच्या बीड बायपास रोडवर. नागरिकांनी ही बाब समोर आणल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली आहे.

औरंगाबादच्या बीड बायपास रोडवर सातत्याने अपघात घडत होते. त्यामुळे याठिकाणी बायपास रुंदीकरण आणि सर्व्हिस रोड बांधावा अशी मागणी सातारा आणि देवळाई परिसरातील नागरिकांनी केली होती. यासाठी नागरिकांनी आंदोलने, मोर्चेही काढले. नागरिकांच्या आंदोलनाला यश आले, पण येथे सर्व्हिस रोड न बांधता उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने बीड बायपासच्या तीन ठिकाणी उड्डाणपुलाचे बांधकाम हाती घेतले. कामाला सुरुवात झाली, मात्र दिरंगाईमुळे उड्डाणपूल रखडला. अखेर उड्डाणपुलाचे बांधकामही पूर्ण झाले. पण खरी पंचाइत बांधकाम पूर्ण झाल्यावर लक्षात आली. रस्त्यापासून उड्डाणपुलाची उंची कमी असल्याचं बांधकाम पूर्ण झाल्यावर लक्षात आलं.

- Advertisement -

हेही वाचा – पक्षप्रमुख पदावरून आता दोन्ही गटांत रस्सीखेच, शिंदे गटाने शिवसेनेची घटनाच वाचून दाखवली

आपली चूक लक्षात येताच ठेकेदार आणि अभियंताचे धाबे दणाणले. आता पुन्हा उड्डाणपुलाची मोडतोड करून बांधकाम करावं लागणार असं वाटत असतानाच त्यांनी वेगळीच युक्ती लढवली. उड्डाणपुलाची उंची वाढवण्याकरता त्यांनी चक्क रस्ता खोदला. पुलाखाली सुमारे सात फूट खड्डा खणण्यात आला आहे. त्यामुळे उड्डाणपूल पूर्णपणे खचला असून पावसाळ्यात पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

गेल्या तीन वर्षांपासून या उड्डाणपुलाचे काम रखडले होते. नागरिकांनी फक्त सर्व्हिस रोडची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने उड्डाणपूल बांधायला सुरुवात केली. तीन वर्षांनंतरही हा पूल अर्धवट राहिल्याने सरकारच्या तिजोरीतील पैसा मात्र खर्च झाला आहे.

हेही वाचा – तारीख उलटली तरी पगार नाही; एसटी कामगार संघटना आक्रमक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -