Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचे संकट? शेतकरी चिंतेत, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचे संकट? शेतकरी चिंतेत, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर नाशिक, औरंगाबाद आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचे संकट असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पुढील ३ दिवसांत राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यात कुठे पाऊस तर कुठे उष्णता आहे. त्यामुळे विचित्र प्रकारचं वातावरण सध्या पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रोगराई पसरली आहे. तर पिक भुईसपाट झाली आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिसकावला आहे.

- Advertisement -

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १३ मार्चपासून मध्य भारताच्या काही भागात, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांसह आसपासच्या भागात हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर IMD GFS मॉडेल व extended range अंदाज या भागांत आणि पूर्व किनार्‍यावर गडगडाटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

नंदुरबार जिल्ह्यात १३ ते १५ मार्च दरम्यान हवामान ढगाळ राहणार आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांचे काढणीसाठी आलेले रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच फळबाग आणि भाजीपाला पिकं भुईसपाट झाली आहेत. गारपिटीमुळे आणि वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा : जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या बदलीच्या हालचाली; ‘यांची’ नावे चर्चेत


 

- Advertisment -