घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअवकाळी पावसाने नाशिकला झोडपले; शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांचा चिखल

अवकाळी पावसाने नाशिकला झोडपले; शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांचा चिखल

Subscribe

नाशिक : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे नाशिक शहर व जिल्ह्यात पहाटेपासूनच पावसाची जोरदार बरसात झाली. पहाटे दोन वाजेपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरात अनेक भागात वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे. विजांच्या यांच्या कडकडाटात झालेल्या पावसात शहरात होळीनिमित्त आलेल्या गोवऱ्या विक्रेत्यांचेही मोठे नुकसान झालं आहे.

तीन दिवसांपूर्वी हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार दोनच दिवसांपूर्वी जळगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील कळवण या ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. रविवारी नाशिक शहरात पावसाची कुठलीही शक्यता वाटत नसताना देखील रात्री अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटे दोन वाजता सुरू झालेल्या पावसाने चार ते पाच तास नाशिकला झोडपून काढले. नाशिक शहरासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात पावसाचा तडाखा बसल्याने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष, गहू, कांदा तसेच पालेभाज्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे आधीच शेती पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने मेटाकोटीला आलेला शेतकरी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे उद्ध्वस्त झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, पुढील तीन दिवस अर्थात आठ मार्चपर्यंत हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यात गारपीट होण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. होळी उत्सवानिमित्त पेठ, सुरगाणा, हरसुल आदींसह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात गोवऱ्या विक्री करणारे विक्रेते नाशिक शहरात दाखल होत असतात. मागील दोन ते तीन दिवसापासून हे विक्रेते नाशिक शहरात दाखल झालेले आहेत. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे गोवऱ्या विक्रेत्यांच मोठं नुकसान झालं आहे. तसेच मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात वीज पुरवठा देखील खंडित झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -