घरताज्या घडामोडीतोपर्यंत नितेश राणे आणि गोट्या सावंतांना अटक नाही ; संग्राम देसाईंनी स्पष्टच...

तोपर्यंत नितेश राणे आणि गोट्या सावंतांना अटक नाही ; संग्राम देसाईंनी स्पष्टच सांगितलं

Subscribe

नितेश राणेंचा त्या प्रकरणाशी संबंध जोडणारा पुरावा सरकारी पक्षानं न्यायालयात अद्याप मांडलेला नाही. न्यायालयात सर्व वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय घेतला जातो. सर्व सायंटिफिक डेटा कलेक्ट केला जातो. संबंधित लोकांशी चर्चा करून मगच हा निर्णय घेतला जातो.

संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली असता सरकारी वकिलांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी कोर्टाकडे दोन दिवसांची मुदत मागितली. त्यामुळे भाजप आमदार नितेश राणे यांची अटक तूर्तास तरी टळली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणेंचे वकील अॅड. संग्राम देसाई यांनी माय महानगरशी बातचीत केलीय.

यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलंय. सरकारी वकिलांनी वस्तुस्थिती न्यायालयासमोर ठेवायची आहे, असं सांगत वेळ मागून घेतला. ज्या वेळी त्यांना वेळेची गरज होती त्यावेळी त्यांनी तशी वेळ मागून घेतली. जर सरकारी पक्षाला वेळ हवा असेल तर आम्हाला आजपर्यंत कसलंही प्रोटेक्शन मिळालेलं नाही. आम्हाला पोलीस कधीही अटक करू शकतात. जर मूळ अर्ज पेंटिंग असताना आरोपीला अटक झाली, तर या अर्जाचा काही उपयोग होणार नाही. सरकारी वकिलांनी अॅफिडेव्हिट देईपर्यंतच्या कालखंडामध्ये आम्हाला संरक्षण मिळणं गरजेचं आहे. त्यावर सरकारी वकिलांनी पुढील सुनावणी होईपर्यंत नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना अटक करण्यात येणार नाही, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असं आश्वासन दिलं, असंही अॅड. संग्राम देसाईंनी सांगितलंय.

- Advertisement -

फिर्यादीचं वर्तन पाहिल्यास त्याचं वागणं हे पहिल्या दिवसापासून संशयित होतं. फिर्यादीला घटना घडते काय, हॉस्पिटलमध्ये जातो काय. सर्व राजकीय मंडळी त्याला भेटायला लगेच येतात काय, त्यानंतर त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड होतं काय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री येऊन त्याचा जाहीर सत्कार करतात. एकंदरीत घटनाक्रम पाहिल्यास त्याला संशय घेण्यास खूप वाव आहे. यात राजकीय षडयंत्र असण्याची दाट शक्यता आहे. तो तपासाचा भा आहे. मेडिकल सर्टिफिकेट आहे ती आरोपीला मिळायची आहेत. त्यामुळे त्यावर आजच्या घडीला भाष्य करणं योग्य ठरणार नाही. परंतु जे वृत्तपत्रामध्ये फोटो छापून आलेले आहेत. त्यावरून त्याला जीवे मारण्याचा कोणाचा उद्देश होता हे प्रथमदर्शनी दिसून येत नाही, असंही ते म्हणालेत.

तसेच नितेश राणेंचा त्या प्रकरणाशी संबंध जोडणारा पुरावा सरकारी पक्षानं न्यायालयात अद्याप मांडलेला नाही. न्यायालयात सर्व वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय घेतला जातो. सर्व सायंटिफिक डेटा कलेक्ट केला जातो. संबंधित लोकांशी चर्चा करून मगच हा निर्णय घेतला जातो. एकदा उच्च न्यायालयानं निर्णय घेतला मग त्यात दुमत होण्याचं काही कारण नाही. फिजिकल हिअरिंग आणि व्हर्च्युअल हिअरिंगमध्ये खूप फरक असतो ही गोष्ट 100 टक्के खरी आहे. परंतु परिस्थिती कोणाच्या हातात नाही, त्यामुळे आम्हाला व्हर्च्युअल हिअरिंगद्वारे केस चालवावी लागेल. फिजिकल हिअरिंगमध्ये पुराव्यांची देवाण घेवाण करणं सोपं जातं. तसेच एकमेकांचे हावभावही समजतात. पण आता व्हर्च्युअल हिअरिंगमध्येच आम्ही केस चालवतोय, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.

माझ्यावर कोणताही ताण आणि दबाव नाही. न्याय मिळण्याकरिता आपण मदत करत असलो. मला असं वाटतं की नितेश राणेंना यात चुकीच्या पद्धतीनं गुंतवण्यात आलेय. नितेश राणेंना न्याय मिळवून देण्यासाठी माझ्याकडून काही मदत झाली तर नक्कीच मला या गोष्टीचा आनंद होईल. गेल्या 24 वर्षांपासून मी या क्षेत्रात आहे, त्यामुळे मला आता ताण वगैरे काहीही येत नाही, असंही ते म्हणालेत.

- Advertisement -

हे ही वाचा – Nitesh Rane : नितेश राणेंना अटकेपासून दिलासा, 7 जानेवारीला अटकपूर्व जामीन अर्जावर होणार सुनावणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -