घरताज्या घडामोडीबाळासाहेबांच्या तैलचित्राचे आज अनावरण; मात्र उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत साशंकता

बाळासाहेबांच्या तैलचित्राचे आज अनावरण; मात्र उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत साशंकता

Subscribe

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज, सोमवारी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अनावरण होणार आहे.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज, सोमवारी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अनावरण होणार आहे. विधान भवनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीविषयी संध्याकाळी उशिरापर्यंत अनिश्चितता होती. (Unveiling of Balasaheb Thackeray oil painting today But doubt about Uddhav Thackeray presence)

बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाच्या सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील सर्वांना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याशी मी स्वत: बोललो असून हा सोहळा अतिशय भव्यदिव्य असा होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात यावे, अशी सूचना केली होती. त्याला मंजुरी देण्यात आली होती. नागपूर येथे डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात राहुल नार्वेकर यांनी २३ जानेवारी रोजी तैलचित्र अनावरण सोहळा आयोजित करण्यात आल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज हा सोहळा होत आहे. यावेळी राहुल नार्वेकर यांच्यासह विधानसभा उपाध्यक्ष उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, राज्य मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, खासदार, आमदार यांच्यासह इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गट आणि ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे विधान भवनातील कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार संध्याकाळी पाचच्या सुमारास उद्धव ठाकरे हे गेट वे ऑफ इंडिया जवळील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला वंदन करायला जातील. त्यानंतर षण्मुखानंद हॉल येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यालादेखील ते उपस्थित राहतील. विधिमंडळातील कार्यक्रम आज संध्याकाळी 6 वाजता असल्याने उद्धव ठाकरे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -