परभणीमध्ये भर उन्हात आढळली ‘नकुशी’

परभणी जिल्ह्यात एक स्त्री अर्भक सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली असून ही आठवड्यातील दुसरी घटना असल्याचे समोर आले आहे.

parbhani unwanted newborn girl child found death
परभणीमध्ये भर उन्हात आढळली 'नकुशी'

गुळखंड फाटा याठिकाणी एक स्त्री अर्भक सापडल्यीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अशीच एक परभणी जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. परभणीतील ताडकळस भागातील झाडगाव परिसरात सोमवारी रस्त्याच्या कडेला रखरखत्या उन्हात उघड्या अंगानं फेकून दिलेले एक स्त्री अर्भक सापडल आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना आज या ‘नकुशी’चा मृत्यू झाला आहे.

नेमके काय घडले?

ताडकळस भागातील झाडगाव परिसरात रस्त्याच्या कडेला रंणरंणत्या उन्हात उघड्या अंगानं निर्दयी माता-पित्याने त्या बाळाला रस्त्यावर टाकले होते. त्या ठिकाणाहून लहान बाळाचा आवाज येत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. गावकऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली असता, त्यांना धक्काच बसला. त्याठिकाणी एक स्त्री अर्भक असल्याचे त्यांना आढळून आले. मात्र त्या बाळावर उपचार करण्यासाठी कोणीही तयार झाले नाही.

अखेर ग्रामस्थांनी घडलेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली, या मिळालेल्या माहितीनुसार ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत, बाळाला जवळच्या स्थानिक शासकीय रुग्णालयात हलवलं. रुग्णालयात दाखल केलेल्या बाळावर उपचार सुरु करण्यात आले. उपचार सुरु असताना बाळाचे वजन कमी असल्याचे लक्षात आले. जन्मता:च हेटाळणी मिळालेल्या या अर्भकाचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला आहे.


वाचा – नासर्डी नदीत आढळले मृत अर्भक

वाचा – मालेगावी अर्भक पुरताना चौघे ताब्यात