UP Election 2022 : गोव्यानंतर आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशात घेणार सभा, सेनेचे 37 उमेदवार रिंगणात

UP Election 2022 shivsena leader aditya thackeray uttar pradesh tour for prachar sabha
UP Election 2022 : गोव्यानंतर आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशात घेणार सभा, सेनेचे 37 उमेदवार रिंगणात

शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे गोवा पाठोपाठ आता उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. गोरखपूर आणि वाराणसी येथे आदित्य ठाकरे सभा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेचे एकूण 37 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यूपीच्या मतदारांना आकर्षिक करण्यासाठी आदित्य ठाकरे काय घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्या शिवसेना खासदार संजय राऊतसुद्धा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उत्तर प्रदेशात बुधवारी चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून एकूण 7 टप्पे मतदानाचे असणार आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक शिवसेनासुद्धा लढत आहेत. यूपीमध्ये काँग्रेस आणि भाजपनेसुद्धा जोरदार तयारी केली आहे. शिवसेनाही निवडणूक दरवेळी लढत असते परंतु अद्याप यश मिळाले नाही. शिवसेनेच्या राष्ट्रीय महत्त्वकांक्षा वाढत असल्याचे एकूणच सगळ्या परिस्थितीवरुन दिसत आहे. गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील शिवसेने नेते आणि मंत्री प्रचारासाठी गेले होते. आदित्य ठाकरेसुद्धा या प्रचाराला गेले होते आता ते उत्तर प्रदेशमध्येसुद्धा प्रचारासाठी सभा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. आदित्य ठाकरे येत्या 24 फेब्रुवारीला सभा घेणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे.

आदित्य ठाकरे, संजय राऊत, 4 टप्प्यांचे मतदान उद्या संपणार आहे. एकूण 7 टप्प्यात मतदानाची प्रक्रिया होणार असून शेवटच्या टप्प्यामध्ये गोरखपूर आणि वाराणसीमध्ये मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशच्या एकूण जागा पाहिल्या तर शिवसेनेच्या 59 उमेदवारांनी अर्ज भरले होते परंतु 22 उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. तर 37 उमेदवार आता रिंगणात आहेत.

फडणवीसांनी शिवसेनेला डिवचलं 

शिवसेनेचे 37 उमेदवार रिंगणात असले तरी यातील किती उमेदवार विजयी होतील हे पाहणं महत्त्वाचे आहे. कारण भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगला टोला लगावला होता की, बाबरीनंतर शिवसेनेच्या किती उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. यानंतरच्या शिवसेनेच्या कामगिरीवरुनही शिवसेनेला फडणवीसांनी डिवचलं होते. दादार नगर हवेलीमध्ये जेव्हापासून शिवसेनेचा खासदार निवडून आल्यापासून शिवसेना आता महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या राज्यात प्रयत्न करत आहे. यामुळे आता शिवसेनेकडून काय मुद्दे उपस्थित होतात याकडे पाहावे लागणार आहे.


हेही वाचा : Punjab Election 2022 : सोनू सूद विरोधात FIR दाखल, मतदानादिवशी बहिणीसाठी प्रचार केल्याचा आरोप