घरताज्या घडामोडीबलात्काराची शिक्षा भोगून परत आलेल्या बापाने केला मुलीवरच बलात्कार!

बलात्काराची शिक्षा भोगून परत आलेल्या बापाने केला मुलीवरच बलात्कार!

Subscribe

देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. सावत्र मोठ्या मुलीवर बलात्कार केल्यामुळे शिक्षा भोगत असताना तात्पुरती सुटका झाल्यावर या नराधमन बापाने अकरा वर्षांच्या लहान मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून बापाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी हडपसर परिसरात राहत असताना १४ वर्षांच्या (तेव्हा अकरा वय) मुलीवर याच आरोपी बापाने बलात्कार केला होता. त्यामुळे त्याला अटक करून, त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली होती.

- Advertisement -

पीडितेची आई दोन्ही मुलींना घेऊन मिळेल तिकडे काम करीत होती. काही दिवस ती तळेगाव परिसरात राहत होती. तेथून महिन्याभरापूर्वीच देहूरोड परिसरात राहण्यासाठी आली. दरम्यान, नराधम बाप काही दिवसांपूर्वी कारागृहातून सुटला आहे. तो पुन्हा या कुटुंबाच्या संपर्कात आला. त्याने घरी आल्यावर अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीला तिची आई दवाखान्यात घेऊन गेली होती. त्यानंतर डॉक्टरांना ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्याचबरोबर देहूरोड येथील डॉक्टरांनी याप्रकरणात स्वतः फिर्याद दिली आहे.  देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.


हे ही वाचा – रामदेव बाबांच्या ‘कोरोनिल’ चं नेटकऱ्यांनी जोडलं थेट बॉलिवूडशी कनेक्शन!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -