मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल भारतची संकल्पना भारतभर प्रसिद्ध केल्यानंतर युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. त्याच प्रमाणे केंद्र सरकारनेही यूपीआय पेमेंटला प्रोत्साहन मिळावे यासाठी अनेक महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. भारताशिवाय मालदीव, श्रीलंकेसह अनेक देशांमध्ये यूपीआय पेमेंटची सुविधा सुरू करण्यात आली. या सुविधेमुळे वापरकर्ते काही सेकंदात एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवू शकतात. त्यामुळे त्यांना हातात रोख कॅश ठेवण्याची आवश्यकता नसते आणो वेळेचीही बचत होते. यंदाच्या काळात देशात अनेक नागरिक हे UPI पेमेंटचा वापर करतात. (UPI Payments will not require internet new feature will be made instant payment)
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : अर्ज भरूनही पैसे आले नाहीत; मुख्यमंत्र्यांनी दिली योजनेबाबत नवीन अपडेट
तुमच्याकडे जर स्मार्टफोन असेल तर या सुविधेचा चांगल्या प्रकारे वापर करता येतो. अशामध्ये आता तुमच्याकडे जर स्मार्टफोन नसेल तरीही तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे दुसर्याला पाठवू शकता. तुम्ही इंटरनेटशिवायही यूपीआय पेमेंट करू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) UPI 123PAY द्वारे फीचर फोन आणि स्मार्टफोन युझर्ससाठी डिजिटल पेमेंट अधिक सोपे केले आहे. याद्वारे तुम्ही तब्बल 10 हजारपर्यंतचा व्यवहार करू शकता.
असे होते विनाइंटरनेट पेमेंट
ज्या वापरकर्त्याकडे स्मार्टफोन नाही ते IVR द्वारे (Interactive Voice Response) व्हॉईस पेमेंट करू शकतात. यासाठी त्यांना ठराविक IVR नंबरवर कॉल करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या योग्य पर्याय निवडून पेमेंट करू शकता. तसेच, दुसरी पद्धत म्हणजे Proximity Sound based Payments (प्रॉक्सिमिटी साउंड-बेस्ड पेमेंट्स). या अंतर्गत तुम्ही तुमच्या फोनच्या जवळ असलेल्या डिव्हाइसमधून (proximity device) येणाऱ्या स्पेशल टोनद्वारे पेमेंट करू शकता. आपण या डिव्हाइसवर आपला फोन टॅप करून पैसे देऊ शकता. याशिवाय वापरकर्ते मिस्ड कॉलच्या माध्यमातूनही पैशांची देवाणघेवाण करू शकतात. यासाठी एका नंबरवर मिस्ड कॉल दिल्यानंतर तुम्हाला एक कॉल येतो. या कॉलमध्ये तुम्ही तुमचा यूपीआय पिन टाकून ट्रान्झॅक्शनची खात्री करू शकता.