GPRS In School Bus : स्कूल बसमध्ये GPRS बंधनकारक, परिवहन विभागाला अप्पर पोलीस महासंचालकांच्या सूचना

स्कूल बसवरचा चालक आणि मदतनिस यांची पोलिसांकडून पडताळणी करणसुद्धा अनिवार्य असल्याच्या सूचना दिल्या आहेत.

Upper Director General of Police instructions Transport Department GPRS mandatory in school bus
GPRS In School Bus : स्कूल बसमध्ये GPRS बंधनकारक, परिवहन विभागाला अप्पर पोलीस महासंचालकांच्या सूचना

राज्यातील स्कूल बसमध्ये आता जीपीआरएस (GPRS) लावणं बंधनकारक असणार आहे. अप्पर पोलीस महासंचालक यांनी परिवहन विभागाला राज्यातील स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता राज्यातील सर्वच स्कूल बसमध्ये जीपीआरएस (GPRS In School Bus) पाहायला मिळणार आहेत. दरम्यान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात स्कूल बससाठी जी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्या नियमावलीचे काटेकोर पालन आणि अंमलबजावणी करण्यात यावी अशी सूचना परिवहन विभागाला देण्यात आली आहे. मनसेकडून स्कूल बसच्या नियमावलीची सक्तीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मनसेच्या मागणीनंतर अप्पर पोलीस महासंचालक यांनी परिवहन विभागाला सूचना दिल्या आहेत.

नवीन शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरु होत आहे. काही दिवसांनंतर शाळा पुन्हा सुरु होणार आहे. यापूर्वीच सर्व स्कूलबसमध्ये जीपीआरएस लावण्यात येण्याची शक्यता आहे. स्कूलबस संदर्भात अनेक पालक तक्रार करत असतात. त्यांच्या तक्रारीवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. तसेच स्कूल बसवरचा चालक आणि मदतनिस यांची पोलिसांकडून पडताळणी करणसुद्धा अनिवार्य असल्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबईत काही दिवसांपुर्वी पोदार शाळेची बस रस्ता चुकली होती. शाळेतून विद्यार्थ्यांना घरी येण्यास विलंब झाल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होते. पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. काही तासांच्या वेळेनंतर स्कूल बस सापडली. बसचा ड्रायव्हर रस्ता चुकल्यामुळे विद्यार्थी वेळेत घरी पोहचू शकले नाही. परंतु काही तासानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले होते. पोदार ही सांताक्रूझमधील नावाजलेली शाळा असून, तिची फीसुद्धा भरमसाठ आहे. एवढी चांगली फी भरूनही मुलांना घरी सोडणाऱ्या स्कूल बसचा सुरक्षितेतवर या निमित्तानं प्रश्न उपस्थित झाला असून, पालकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केलीय. शाळेच्या फॅसिलिटीसाठी एवढे पैसे मोजूनही इतका निष्काळजीपणा कसा काय करू शकता?, असा प्रश्न उपस्थित करत पालकांनीही शाळा प्रशासनाला भंडावून सोडलं होते.


हेही वाचा : आव्हाडांचा ताफा वाहतूक कोडींत अडकला अन् पोलिसांनी उचलला सर्वसामान्यावर हात