घरदेश-विदेशUPSC Result : देशात प्रदीप सिंह तर राज्यात अभिषेक सराफ अव्वल

UPSC Result : देशात प्रदीप सिंह तर राज्यात अभिषेक सराफ अव्वल

Subscribe

नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) जाहीर करण्यात आला झाला आहे. परीक्षेत प्रदीप सिंह देशात अव्वल आला असून महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. तर जतिन किशोर दुसऱ्या क्रमांकावर असून प्रतिभा वर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच प्रतिभा वर्मा या महिला उमेदवारांमध्येही पहिल्या क्रमांकावर आहेत. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अधिकृत यादी UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

ही लेखी परिक्षा सप्टेंबर २०१९ मध्ये पार पडली असून फेब्रुवारी-ऑगस्टदरम्यान झालेल्या मुलाखती आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आधारे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली असून ११ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान २०१९ मध्ये प्रथमच लागू करण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास (EWS) कोट्यातून ७८ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील उमेदवार –

  • नेहा भोसले (१५)
  • बीड मंदार पत्की (२२)
  • योगेश पाटील (६३)
  • राहुल चव्हाण (१०९)
  • सत्यजित यादव (८०१)

सत्यजित यादव मूळचा सांगली जिल्ह्यातील अहिरवाडी येथील निवासी आहे. या निकालानंतर सत्यजितने परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सत्यजितने आतापर्यंत चार वेळा परीक्षा दिली होती. अखेर पाचव्या प्रयत्नात त्याला यश मिळालं आहे. आपल्या यशामागे आई, वडील आणि बहिणीचा खूप मोठा वाटा असल्याचं सत्यजित सांगतो. यूपीएससीकडून दरवर्षी भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि इतर केंद्रीय सेवांसाठी नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाते.

हेही वाचा –

GoodNews! एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार – ५५० कोटी रुपये मंजूर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -