घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रउर्फी जावेद जिथे भेटेल तिथे तिचे थोबाड रंगवेल; चित्रा वाघ भडकल्या, अजून...

उर्फी जावेद जिथे भेटेल तिथे तिचे थोबाड रंगवेल; चित्रा वाघ भडकल्या, अजून काय म्हणाल्या…

Subscribe

नाशिक : भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात सध्या शाब्दीक युध्द सुरू असून सोमवारी नाशिक दौर्‍यावर असलेल्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर पुन्हादा एकदा निशाणा साधला. मला तर ही उर्फट बाई कोण आहे हे माहीतही नाही, ज्या पध्दतीने नंगानाच सुरू आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही बाई मला ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी थोबड रंगवेन असा इशाराही वाघ यांनी दिला आहे.

निर्माता करण जोहरच्या ‘बिग बॉस ओटीटी’ या रिअ‍ॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती सतत तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. तिच्या रिविलिंग ड्रेसची चर्चा संपूर्ण देशात पाहायला मिळते. आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीला कपड्यांवरुन सुनावले. त्यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली. आता उर्फीने शिवीगाळ करत चित्र वाघ यांना उत्तर दिले आहे. मला कोणतेही ट्रायल नकोय. जर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबीयांनी संपूर्ण संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जायला तयार आहे. संपूर्ण जगाला सांगा की तुम्ही कसे आणि कुठून पैसे कमावता. तुमच्या पार्टीमधील अनेक पुरुषांवर शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. तुम्ही त्या महिलांसाठी काही करु शकता का हे पाहा चित्रा वाघ या आशयाची स्टोरी उर्फीने पोस्ट केली आहे.

- Advertisement -

त्यापाठोपाठ उर्फीने ट्विटर अकाऊंटवर आणखी एक पोस्ट लिहिली आहे. या ट्वीटमध्ये तिने माझ्या नवीन वर्षाची सुरुवात ही एका राजकिय नेत्याने पोलीस तक्रार केल्यामुळे झाली आहे असे म्हटले आहे. उर्फीच्या व्टिटमुळे चित्रा वाघ संतापल्या आहेत. त्या म्हणाल्या की, मला तर ही उर्फट बाई कोण आहे माहीतही नाही. एका बाईने मला व्हिडीओ पाठवले, तिने मला सांगितले मुंबईच्या रस्त्यावर काय चालले आहे बघा. हा नंगानाच खपवून घेणार नाही. आम्ही पोलीसांत तक्रार केली आहे. तुम्ही चॅनलवाले बातम्या करताना ब्लर का दाखवतात कारण तुम्ही ते दाखवू शकत नाही. मग अशा या उघडया नागडया फिरणार्‍या मुली या महाराष्ट्रात चालणार नाही असे खडेबोल त्यांनी सुनावले आहे. ही बाई मला ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी थोबाडं रंगवेन आणि नंतर तुम्हाला व्टिट करून सांगेल असे चित्रा वाघ यांनी सांगितले. काय व्हायचं ते होउ द्या असेही त्या म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -