Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन चित्राजी, संजय आठवतोय का? उर्फी थेट वाघांना भिडली

चित्राजी, संजय आठवतोय का? उर्फी थेट वाघांना भिडली

Subscribe

Urfi Jawd on Chitra Wagh | संजय राठोड यांच्यावरून प्रश्न उपस्थित करून उद्या मी भाजपात आल्यावर तुमच्यासोबत मैत्री करण्यासाठी मी आतुर आहे असंही उर्फीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मुंबई – प्रसिद्ध मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. उर्फीच्या अतरंगी कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे. यावरून उर्फी जावेदनेही चित्रा वाघ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आता पुन्हा उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. संजय राठोड यांना मिळालेल्या क्लीनचिटवरून प्रश्न उपस्थित करत, ‘भाजपामध्ये प्रवेश केल्यावर तुमच्यासोबत मैत्री करण्यासाठी मी आतुर आहे,’ असंही उर्फीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा – तुम्हाला इथे आवाज उठवताना बघायचंय… चित्रा वाघ यांना उर्फीचे ‘त्या’ घटनेवरून प्रत्युत्तर

- Advertisement -

उर्फीने ट्वीट करून चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. ‘भाजपामध्ये आल्यानंतर तुमच्यासोबत घनिष्ठ मैत्री करण्यासाठी मी आतुर आहे. तुम्हाला संजय आठवतोय का चित्राजी? तुम्ही भाजपात प्रवेश केल्यानंतर तुमची तर त्यांच्यासोबत खूप चांगली मैत्री झाली. एनसीपीत असताना तुम्ही त्यांच्याविरोधात इतका हल्लाबोल केला, पण भाजपामध्ये आल्यानंतर तुम्ही त्यांच्या सर्व चुका विसरलात,’ असा टोला उर्फीने लगावला आहे. दरम्यान, उर्फीला राज्यातील राजकारणातील ही माहिती कोण पुरवत असेल असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.


दरम्यान, आज सकाळी चित्रा वाघ यांनी तिच्याविरोधात पोस्ट केली होती. , “आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही पण जिथे आपण समाजात वावरतो, सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे. तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये ? व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान नं राखता, त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं,हा ही धर्म नाही का ? लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का ?” असं चित्रा वाघ यांनी ट्वीट मधून म्हटलं होतं.

- Advertisement -

सोमवारी चित्रा वाघ यांनी “मला तर ही उर्फट बाई कोण आहे हे माहीतही नाही, ज्या पध्दतीने नंगानाच सुरू आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही बाई मला ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी थोबाड रंगवेन” असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला होता. त्यावर, ‘पोलीस एक अपघात म्हणून या प्रकरणाचा तपास करत होते. ते नराधम तिला 12 किलो मीटरपर्यंत फरफटत घेऊन गेले, तिची हाडं मोडली होती, तिच्या अंगावर कपडे नव्हते. चित्रा वाघ या घटनेतील एक आरोपी तुमच्याच पक्षाशी संबंधित आहे. मला तुम्हाला इथे आवाज उठवताना बघायला आवडेल,” असं उर्फीने म्हटलं होतं.

हेही वाचा – आपल्या लेकी-बाळींच्या समोर असे आदर्श… चित्रा वाघ उर्फीवर पुन्हा संतापल्या

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -