घरताज्या घडामोडीउर्मिला मातोंडकरांनी विधान परिषदेची ऑफर नाकारली, पण...

उर्मिला मातोंडकरांनी विधान परिषदेची ऑफर नाकारली, पण…

Subscribe

राज्यपाल नियुक्तीसाठी रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरांनी विधान परिषदेची ऑफर नाकारली.

राज्यात सध्या विधानपरिषेवरील नियुक्त्यांच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यपाल नियुक्तीसाठी रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण उर्मिला मातोंडकरांनी विधान परिषदेवर जाण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले वडेट्टीवार?

‘विधान परिषदेकरता आम्ही अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विचारणा केली होती. पण, त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचे सांगत विधान परिषदेसाठी स्पष्टपणे नकार दिला. तसेच आता जर त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्यांचे स्वातंत्र्य आहे.’

- Advertisement -

उर्मिला मातोंडकर सेनेच्या आमदार?

राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झालेल्या, मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढलेल्या सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेव पाठवले जाणार आहे, अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत. उर्मिला मातोंडकर यांचे नाव शिवसेनेकडून निश्चित करण्यात आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उर्मिला मातोंडकर यांच्याशी बोलणे झाले असल्याचे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले. विशेष म्हणजे उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्यास होकार कळवल्याचे समजते. अभिनेत्री कंगना रानौत विरुद्ध ठाकरे सरकार या संघर्षात उर्मिला यांनी सडेतोड भूमिका घेत कंगनाला चांगलेच फटकारले होते. त्यातूनच शिवसेनेतून उर्मिला यांचे नाव विधान परिषदेसाठी पुढे आल्याचे कळते. राज्यपाल नियुक्त शिवसेनेच्या चार आमदारांपैकी मिलिंद नार्वेकर, सचिन अहिर, उर्मिला मातोंडकर यांची नावे आता निश्चित झाली असून शिवसेनेच्या एका जागेचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे.


हेही वाचा  – उर्मिला मातोंडकर सेनेच्या आमदार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -