Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र ताई तुझे थोर उपकार! भावाचा जीव वाचवण्यासाठी सख्ख्या बहिणीने केलं स्वत:च यकृतदान

ताई तुझे थोर उपकार! भावाचा जीव वाचवण्यासाठी सख्ख्या बहिणीने केलं स्वत:च यकृतदान

Related Story

- Advertisement -

जगात आईनंतर भावासाठी जीव देणारी जर कोण असेल तर ती बहीण असते. भाऊ कसाही असला तरी संकटाच्या वेळी स्वत:च्या जीवची द्यायला बहीण तयार असते. असाच काहीसा अनुभव सुरतच्या सुरेश देवानी यांना आला आहे.

भारतामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असतानाही सुरेश देवानी यांची बहीण सुनिता गजेराने यांनी आजारी भावाच्या मदतीसाठी यूएसमधून भारत गाठले. यामुळे त्या आपल्या भावाला अवयव दान करत नव जीवनदान देऊ शकल्या. मुळचे सुरतचे रहिवासी असलेले ३६ वर्षीय सुरेश देवानी मागील एक वर्षापासून लिव्हर सिरोसिस या आजाराने ग्रस्त आहेत. ज्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी लवकरं यकृत प्रत्यारोपण करणं गरजेचे होते. सुरेश देवानी यांना जून २०२० मध्ये लिव्हर सिरोसिस आजार असल्याचे समजल्य़ानंतर त्यांनी मागील एक वर्षांपासून ते हॉस्पिटलमध्ये फेऱ्या मारत होते.

- Advertisement -

यात अनेक संसर्गजन्य आजारांमुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. अशा परिस्थितीत त्यांना वाचवण्यासाठी एक पर्याय शिल्लक होता तो म्हणजे यकृत प्रत्यारोपणाचा. पण कोरोनामुळे अवयव दानाचे प्रमाण घटले. त्यामुळे सुरेश यांना यकृत मिळणे अधिकच कठीण झाले होते. अशावेळी सुरेशच्या पत्नी यांना यकृत दान करण्यासाठी विचारण्यात आले मात्र प्रत्यारोपणासाठी त्यांचे यकृत जुळत नव्हते. भावाच्या या स्थितीची माहिती युएसला राहणाऱ्या बहीणीला समजली. यावेळी तिने स्वत:हून पुढाकार घेत भावाला अवयनदान केले.

कोरोना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर बंधने असल्याने सुनिता यांना भारतात पोहचणे अधिकच आव्हानात्मक होते. तसेच अवयव दाता परदेशातील असेल तर भारतामध्ये जिवित अवयवाचे जान करण्यासंदर्भात कडक नियम आहेत. अवयव तस्करांना आळा घालण्यासाठी हे नियम आहेत. मात्र सुरेश यांचा जीव वाचवणे त्या घडीची सर्वात मोठी गोष्ट होती. त्यामुळे सर्व निमय अटींची पूर्तता करत भावासाठी सुनिता अखेर मुंबईत पोहचल्या. या गोष्टींसाठी मुलुंडमधील फोर्टिस हॉस्पिटलमधील टीम्‍सनी यूएस एम्‍बेसी व एफबीआयकडून आवश्‍यक कागदपत्रे हस्‍तांतरित करण्‍यामध्‍ये आणि प्रत्‍यारोपण प्रक्रियेसाठी डायरेक्‍टर ऑफ मेडिकल एज्‍युकेशन अॅण्‍ड रिसर्च (डीएमईआर) यांच्‍याकडून अंतिम मान्‍यता मिळवण्‍यामध्‍ये सुरेशच्‍या बहिणीला मदत केली.

- Advertisement -

मुंलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील लिव्‍हर ट्रान्‍सप्‍लाण्‍ट अॅण्‍ड एचपीबी सर्जरी विभागाचे सल्‍लागार व प्रमुख सर्जन डॉ. गौरव गुप्‍ता यांनी ही प्रत्योरोपण शस्त्रक्रिया यशस्वी केलीय. या एकूण केसबद्दल डॉ. गौरव गुप्‍ता सांगतात की, या केसमधून आपल्याला एक गोष्टीची शिकवण मिळते की, दूर परदेशात असलो तरी नातं कधीच कमकुवत होत नाही. तसेच ही केस अवयव दानाचे मोठं कार्य करण्याची प्रेरणा देते. भारतात दरवर्षी जवळपास ५ लाख व्यक्तींना अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. प्रत्‍यारोपणांसाठी दात्यांच्‍या अनुपलब्‍धतेमुळे अनेक रूग्‍णांचा मृत्‍यू होतो. म्‍हणूनच अवयवदानाचे महत्त्व समजून घेण्‍याची काळाची गरज आहे.


 

- Advertisement -