घरमहाराष्ट्रपुणेMVA : ईडी-सीबीआयचा वापर ही भाजपची निवडणूक तयारी; थोरातांनी सांगितले, 2029 ची...

MVA : ईडी-सीबीआयचा वापर ही भाजपची निवडणूक तयारी; थोरातांनी सांगितले, 2029 ची निवडणूक कशी होणार

Subscribe

इंदापूर (पुणे) – भारतीय जनता पक्षाची निवडणुकीची तयारी वेगळी आहे. विरोधकांना तुरुंगात डांबायचे. त्यांच्यावर ईडी, सीबीआय सोडायचे, ही भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीची तयारी आहे. भाजप पुन्हा निवडून आली तर 2029 ची निवडणूक रशिया प्रमाणे होईल. समोर एकही विरोधक नसेल फक्त एकाच व्यक्तीला मतदान करावे लागेल. पण भाजप नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे की तुम्ही विरोधकांना तुरुंगात डांबू शकता. मात्र जनतेला डांबू शकत नाही, असा इशारा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपला दिला. हर्षवर्धन पाटलांचा नामोल्लेख टाळून थोरातांनी जुन्या मित्राला टोला लगावला.

इंदापूरमध्ये महाविकास आघाडीच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत आहे. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, बारामती लोकसभा उमेदवार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

- Advertisement -

लोकशाही विरुद्ध हुकूमशाहीचीही निवडणूक

बाळासाहेब थोरात म्हणाले की, शरद पवारांनी कोणत्याही सत्तेसाठी लढण्याचा निर्णय घेतलेला नाही. तर लोकशाही तत्त्व, पुरोगामी महाराष्ट्राचे तत्त्व, शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार. जो बहुजनांचा विचार आहे. बहुजन समाजाचा विचार हा आपला विचार आहे. राज्यघटनेचा विचार आहे. राज्यघटनेतील तत्त्व हे आमचे तत्त्व आहेत, आणि त्यांची पाठराखण करणे ही आमची जबाबदारी आहे. याची जाणीव ठेवून शरद पवार धावपळ करत आहेत. हे तत्त्व, विचार वाचवण्यासाठी शरद पवारांनी लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि आता मणिपूर ते मुंबई यात्रा केली आहे. ऊनवारा याची तमा न बाळगता ते चालत राहिले ते सत्ते करती नक्कीच नाही. लोकशाही तत्त्वांसाठीच ते लढत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भोवतीही रोज नवे संकटे उभे केले जात आहे. मात्र तेही लढत आहेत. कारण त्यांना माहित आहे की आपण शाश्वत विचारांसाठी लढत आहोत. देशाच्या हितासाठी, देशाच्या विकासासाठी आणि सामान्य माणसांच्या अधिकारांसाठी आपण लढत आहोत, असे सांगत बाळासाहेब थोरात म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Loksabha 2024 : एकनाथ शिंदेंची अडचण होऊ नये म्हणून…; विजय शिवतारे लवकरच करणार मोठी घोषणा

भाजपची निवडणूक तयारी विरोधकांना तुरुंगात डांबण्याची

2029 ची लोकसभा निवडणूक ही काल-परवा रशियाची जशी विरोधकांशिवाय निवडणूक झाली तशी भारतात होणार असल्याची भीती बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, देशातील राजकीय पक्ष सध्या निवडणुकीची तयारी करत आहेत. सामान्य माणसाला काय देता येईल, याचा विचार ते करत आहेत. जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख कसा करता येईल यासंबंधीची तयारी सुरु आहे. मात्र भाजपची तयारी सुरु आहे की कोणत्या नेत्याला आत टाकायचे. काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनासुद्धा तुरुंगात टाकण्यात आले. भाजपने आता ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय यांना जोरात कामाला लावले आहे. काँग्रेसचे खाते गोठवण्यात आले आहे. अशा पद्धतीने भाजपची निवडणुकीची तयारी सुरु आहे. त्यांना दहशतीतून निवडणूक जिंकायची आहे, हे आता लोकांच्याही लक्षात आले आहे. भारतीय जनता पक्षाला आव्हान देताना थोरात म्हणाले, तुम्ही विरोधकांना तुरुंगात डांबू शकता. आमची खाती गोठवू शकता पण तुम्ही जनतेला डांबू शकत नाही, हेही लक्षात ठेवा. असा इशारा थोरातांनी भाजपला दिला.

हर्षवर्धन पाटलांना थोरातांचा टोला

बाळासाहेब थोरात म्हणाले, सुरुवातीला आम्ही या मतदारसंघात खुप काम केले. कार्यक्रम केले. आमचे मित्र अडचणीत सापडले आणि तिकडे गेले. ते आता काय करतील माहित नाही. मीही काही विचारले नाही. मित्र कुठेही असो, पण मित्राला आता शांत झोप लागत असेल तर लागू द्या, हर्षवर्धन पाटील यांचा नामोल्लेख टाळून थोरातांनी त्यांना टोला लगावला. त्यासोबत ते म्हणाले की, मित्राला शांत झोप लागत असेल लागूद्या, ही जनता शांत झोपणार नाही. जनतेने सुप्रिया सुळेंना पुन्हा संसदेत पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

हेही वाचा : Amit Shah : …तर आपल्याला जय गुजरात घोषणा देण्याची सक्ती; अभिनेत्याची अजितदादा, उदयनराजेंबद्दलची पोस्ट व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -