घरताज्या घडामोडीबंद औद्योगिक कंपन्यांचा ऑक्सिजन साठा वैद्यकिय कारणासाठी वापरा : जिल्हाधिकारी

बंद औद्योगिक कंपन्यांचा ऑक्सिजन साठा वैद्यकिय कारणासाठी वापरा : जिल्हाधिकारी

Subscribe

कोरोना बाधित रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या अनुषंगाने ऑक्सिजनची आवश्यकता असणार्‍या प्रत्येक रुग्णांना तो पुरेसा उपलब्ध होणे गरजेचे आहे. आजच्या परिस्थितीत उत्पादित होणार्‍या ऑक्सिजनपेक्षा अधिक प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने उत्पादक कंपन्यांनी निर्मिती वाढविण्यावर भर देण्यात यावा, तसेच औद्योगिक क्षेत्रातील ज्या कंपन्या बंद आहेत त्यांच्याकडील ऑक्सिजन वैद्यकिय कारणासाठी वापरण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना दिल्या आहेत.

ऑक्सिजन पुरवठ्याबाबत ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांनसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील 148, ग्रामीण भागातील 70 व मालेगावमधील 34 अशा एकूण 252 रुग्णालयांत ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

- Advertisement -

ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांनी ऑक्सिजनची निर्मिती वाढवून सद्या पुरविण्यात येणार्‍या ऑक्सिजन व्यतिरिक्त किमान 10 टक्के अधिक ऑक्सिजनचा पुरवठा शासकीय रुग्णालयांना करण्यात यावा. तसेच अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी मालेगाव येथील यंत्रणेशी समन्वय साधून उपलब्ध होणार्‍या ऑक्सिजनपैकी काही प्रमाणात ऑक्सिजन मालेगाव येथे देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन जेजुरकर यांच्यासह ऑक्सिजन निमिर्ती करणार्‍या कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -