घरताज्या घडामोडीउषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

Subscribe

उषा मंगेशकर आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Usha Mangeshkar and Pandit Hariprasad Chaurasia was presented with the Lata Mangeshkar Award)

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत बुधवारी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारांचे वितरण रविंद्र नाटयमंदिर येथे करण्यात आले. यावेळी सन 2020 सालचा पुरस्कार उषा मंगेशकर आणि 2021 सालचा पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात आला.

- Advertisement -

या पुरस्कारासह भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थिती होते.

- Advertisement -

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना सन 2020-21 या वर्षाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (मरणोत्तर) जाहीर करण्यात आला आहे. 5 लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

गायन आणि संगीत क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पंडित चौरसिया यांची निवड समितीने एकमताने या पुरस्कारासाठी निवड केली होती.

तसेच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सन 2019-20 आणि सन 2020-21 या वर्षाचा हा पुरस्कार अनुक्रमे आतांबर शिरढोणकर आणि संध्या रमेश माने यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.


हेही वाचा – अशी कीड तात्काळ समूळ नष्ट करावी; पीएफआयवरील बंदीनंतर राज ठाकरेंकडून अमित शाहांचे आभार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -