Vaccination : २ ते १७ वर्षांच्या मुलांना जानेवारीपासून मिळणार ‘Covaxin’ ची लस

या वयोगटातील मुलांना 'कोवॅक्‍सिन' आणि 'झायडस कॅडिला' याचा डोस देण्यात येणार आहे.

Vaccination: Children from 2 to 17 years will get Covaxin vaccine from January
Vaccination : २ ते १७ वर्षांच्या मुलांना जानेवारीपासून मिळणार 'Covaxin' ची लस

गेले दीड वर्षे संपूर्ण जग कोरोनाच्या गर्तेत अडकले होते. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होताच अनेक गोष्टींवर लादण्यात आलेले निर्बंध हटवण्यात आले. मात्र असे असले तरी कोरोना पूर्णत: नाहीसा झालेला नाही,तरीदेखील नागरिक विनामास्क फिरत आहेत. कोरोनामुक्‍त होण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची मोफत लस देण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी, मार्च-एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.याच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर २ ते १७ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे. या वयोगटातील मुलांना ‘कोवॅक्‍सिन’ आणि ‘झायडस कॅडिला’ याचे डोस देण्यात येणार आहेत.त्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. मात्र केंद्र सरकारने या परवानगीला अद्यापही मान्यता दिली नसून, जानेवारीपासून या वयोगटातील मुलांना लस देण्यात येईल,अशी माहिती टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिली आहे. २ ते १७ वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण करण्यात येणार असून, या वयोगटातील मुलांच्या नोंदीसाठी केंद्राला ‘कोविन’ ऍपमध्ये बदल करण्यात येत आहे.

२ ते १७ वयोगटातील मुला-मुलींनी २८ दिवसाने कोवॅक्सीनची लस देण्यात येईल. याशिवाय झायडस कॅडिला या लसीचाही कालावधी २८ दिवसाच्या फरकाने असणार आहे. कोवॅक्‍सिन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरी लस देण्यात येते तर कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना ८४ दिवसांनंतर दुसरी लस देण्यात येते. लसीकरण केलेल्या नागरिकांमध्ये सकारात्मक परिणाम समोर आला असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांंमध्ये सिरो सर्वेदेखील करण्यात आला आहे.


हे ही वाचा – अनिल देशमुखांच्या अटकेची किंमत भाजपला चुकवावी लागेल, पवारांचा नागपूरमधून इशारा