घरमहाराष्ट्रराज्यात सर्वांना मोफत लस देण्याबाबत १ मेला निर्णय? अजित पवारांनी दिले संकेत

राज्यात सर्वांना मोफत लस देण्याबाबत १ मेला निर्णय? अजित पवारांनी दिले संकेत

Subscribe

महाराष्ट्रात सर्वांना मोफत लस देण्याबाबात १ मे रोजी निर्णय होणार असल्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. माध्यमांशी संवाद साधताना अजित पवरांनी हे संकेत दिले. मोफत लसीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील. तसंच रेमडेसिवीर, लसीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ग्लोबल टेंडरची प्रक्रिया येत्या १ मे पासून सुरू करण्यात येणार असून त्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

अनेक राज्यांमध्ये मोफत लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत अजित पवारांनी दिली. मोफत लसीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री १ मे रोजी भूमिका जाहीर करणार आहेत. त्याबद्दल तेव्हाच सांगितलं जाईल. आत्ता मी तुम्हाला इतकी लस देऊ शकणार नाही, असं पूनावाला यांनी आम्हाला सांगितलं. त्यांनी सांगितलं की माझ्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला लस देईन. उरलेली लस तुम्ही इतर कंपन्यांकडून घ्या. सध्या ते इंग्लंडला गेले आहेत. ते परत आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलू, असं अजित पवार यांनी सांगितलं.

- Advertisement -

रेमडेसिवीर, लसीसाठी ग्लोबल टेंडर काढणार

रेमडेसिविर आणि लसींची वाढती मागणी लक्षात घेता आता राज्य सरकारने रेमडेसिवीर, लसीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. ग्लोबल टेंडरची प्रक्रिया येत्या १ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. ५ सदस्यांच्या समितीचे मुख्य सचिव अध्यक्ष असतील. त्यांच्यासोबत, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त, सार्वजनिक आरोग्याचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षणचे सचिव आणि उद्योग खात्याचे सचिव त्याचे सदस्य असतील. टेंडर काढायच्या सूचना सीताराम कुंटेंना दिल्या आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -