घरमहाराष्ट्र'मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी झाली, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील' - अजित...

‘मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी झाली, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील’ – अजित पवार

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोफत लसीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मोफत लसीकरणाबाबत उद्या होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत होण्याची शक्यता असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी झाली, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील अशी महत्त्वाची माहिती दिली. छत्रपति शिवाज महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही मंत्र्यांनी विधान भवनातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उद्या कॅबिनेटची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत लसीकरणाबद्दल १ मे रोजी सरकारची काय भूमिका आहे यावर चर्चा केली जाणार आहे. यानंतर बैठकीत सर्वानुमते काय निर्णय घेण्यात आला याची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देतील, असं अजित पवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मोफत लसीकरणाबाबत उद्या निर्णयाची शक्यता असल्याचं देखील सांगितलं. मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी झाली आहे, मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी बाकी आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत चर्चा केली जाील. राज्याच्या जनतेचा हिताचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

लसीची कमतरता केवळ महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशात आहे. याशिवाय, ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता जाणवत आहे. या सगळ्याचे अधिकारी केंद्र सरकारला आहेत. आम्ही रेमडेसिवीर कंपन्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की पूर्वी आम्हाला रेमडेसिवीर राज्य सरकारला थेट देता येत होती, आता केंद्र ठरवतं, असं सांगितलं. सध्या देशात उत्पादन होत असलेल्या रेमडेसिवीर अपुऱ्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -