Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Vaccination: नंदुबारच्या आदिवासी भागातील तीन गावात ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण...

Vaccination: नंदुबारच्या आदिवासी भागातील तीन गावात ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण

नंदुरबार जिल्ह्यातही 25 फेब्रुवारी ते 6 मार्च 2021 या कालावधीत लसीकरणाबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात आली

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील आदिवासी भागात लसीकरणा संदर्भात अनेक गैरसमज होते. मात्र आदिवासी बहुल भागात लसीकरणाबाबत असलेले गैरसमज आणि अफवा यांच्यावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे मात केली आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातल्या तीन गावांनी ४५ वर्षावरील लसीकरणाचे निर्धारीत उदिष्ट १०० टक्के उद्दिष्य साध्य केले. (Vaccination: In three villages of Nandubar tribal area, 100 per cent vaccination of citizens above 45 years has been completed)  विविधता असलेल्या देशात लसीकरण कार्यक्रमाची राबवणे हे प्रशासकीय दृष्टीने आव्हान होते.  त्याचप्रमाणे ग्रामीण आणि अदिवासी भागातील जनतेला लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे हे त्याविषयी असलेल्या गैर समजुती आणि चुकीच्या धारणा यामुळे त्याहून अवघड होते,असे लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले.

नंदुरबार तालुक्यातील सिंद गव्हाण, शहादा तालुक्यातील पुरूषोत्तमनगर आणि नवापूर तालुक्यातील सागळी या तीन गावातील ४५ वर्षावरील सर्व नागरिकांचे १०० टक्के लसीकरण झाले आहे.  आणखी काही गावात जवळपास ८० टक्के आणि ३० ते ४० गावात ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर ही जिल्ह्यातील ४५ वर्ष वयावरील शंभरटक्के लसीकरण साधणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

- Advertisement -

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात लस घेतल्यामुळे कोरोना होतो, लस घेतल्यानंतर ताप आला आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले तर तो रुग्ण जिवंत परत येत नाही, अशा अफवा होत्या. त्यामुळे सुरुवातीला सुरुवातीचा दिड महिना नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद दिला नाही. त्यांनतर प्रशासनाने नागरिकांच्या मनातील हे गैरसमज दूर करण्यासाठी जिल्ह्यात त्यासंदर्भात बहुस्तरीय जनजागृती अभियान राबविण्यात आली. त्यानंतर नागरिक लसीकरण करण्यास तयार झाले असे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौदळ यांनी सांगितले.

लसींच्या जनजागृतीसाठी केल्या ‘या’ उपाययोजना

  • नंदुरबार जिल्ह्यातही 25 फेब्रुवारी ते 6 मार्च 2021 या कालावधीत लसीकरणाबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात आली
  • अधिकाऱ्यांनी यांनी गावभेटीच्या माध्यमातून गावकर्यांशी संवाद साधला. गैरसमज दूर करणाऱ्या ऑडीओ क्लिप्स स्थानिक आदिवासी भाषेत तयार करून त्यांच्यापर्यत पोहचवण्यात आल्या.
  • जनजागृतीविषयक व्यापक मोहिमेअंतर्गत 36 जिल्ह्यांत 16 व्हॅन्स द्वारे फिरती बहुमाध्यमी प्रदर्शने आयोजित करण्यात आली.
  • अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाच्या जनजागृतीसाठी कॉर्नरसभा , ग्रामसभा , दवंडी , अशा विविध प्रकारच्या प्रचार साधनांचा वापर केला.
  • प्रत्येक गावात ग्रामसेवक, आशासेविका आणि मुख्याध्यापक / शिक्षक यांचे पथक तयार करून त्यांनी घरोघरी भेटी देऊन लोकांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले.

हेही वाचा – Coronavirus : कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतर ताप का येतो? जाणून घेऊ

- Advertisement -

 

- Advertisement -