घरCORONA UPDATEVaccination: जूनपासूनच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरळीत होईल. कारण की...

Vaccination: जूनपासूनच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरळीत होईल. कारण की…

Subscribe

येत्या काळात अनेक लसी उपलब्ध होण्याची साकारात्मक चिन्हे

राज्यात कोरोना आळा घालण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. देशासह राज्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. राज्यासह देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली. मात्र राज्यातील लसीच्या अपुऱ्या पुरवढ्यामुळे बऱ्याच राज्यांनी लसीकरणाला सुरु केली नाही. केंद्र सरकारने दिलेली जबाबदारी स्वीकारुन राज्यात १ मेला उपलब्ध असलेल्या लसीच्या साठ्यातून काही अंशी लसीकरण करण्यात आले. उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात येईल. केंद्र सरकारने राज्याला जास्तीत जास्त लसींचा पुरवठा केल्यास राज्य कोरोनावर नक्की मात करेल. तो पर्यंत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लसीसाठी गडबड गोंधळ, घाई करु नका असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्र्यांनी केले. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण जून, जुलै महिन्यातच सुरळीत होईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितेल. राज्यातील लसींचा पुरवठा जून, जुलै महिन्यातच सुरळीत होण्यामागे काय कारण आहे? जाणून घ्या.

  • १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी येत्या काळात केंद्र सरकारकडून १८ लाख लसी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याची तारिख देण्यात आलेली नाही. कदाचित जून महिन्यात या लसी मिळू शकतात.
  • देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या कंपन्यांनी त्यांचे उत्पादन वाढवले आहे. त्यामुळे जून जुलै महिन्यात लस उत्पादन वाढलेले असेल.
  • जून महिन्यापासून कोव्हॅक्सिनच्या जास्त लसी उपलब्ध होणार आहेत. तर कोव्हिशिल्ड लसीच्या दर महिन्याला १ कोटी मात्रा देण्याचे सीरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे.
  • रशियाकडून आलेल्या स्फुटनिक व्हीच्या पहिल्या लसी हैदराबादमध्ये दाखल आल्या आहेत. १ मे पासून ही लस भारताला मिळणार होती. जून महिन्यात ही लस देखिल देण्यात येऊ शकते.
  • मे महिन्यात झायडस कॅडिला या लसीला देखिल मान्यता मिळण्याची शक्यता आहे. झायडल कॅडिला लसीला मान्यता मिळाल्यास जुलै, ऑगस्ट महिन्यात ही लस देखिल देण्यात येऊ शकते.
  • जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या लसीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

सद्याच्या परिस्थितीत जरी राज्यासह देशात लसीचा पुरवठा कमी असला तरी येत्या काळात अनेक लसी उपलब्ध होण्याची साकारात्मक चिन्हे आहेत. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी थोडा सयंम बाळगळे गरजेचे आहे.

- Advertisement -

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याआधी कोविन अँप किंवा कोविन वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशन न करता लसीकरण केंद्रावर गर्दी न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री त्याचप्रमाणे आरोग्यमंत्र्यांकडून करण्यात आले आहे.


हेही वाचा – Corona Update : अरे व्वा! कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी ‘म्युझिक थेरपी’चा वापर, हॉस्पिटलचा भन्नाट प्रयोग

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -