Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पॉझिटिव्हीटी दर जास्त असलेल्या जिल्ह्यात लसीकरण वाढवणार

पॉझिटिव्हीटी दर जास्त असलेल्या जिल्ह्यात लसीकरण वाढवणार

Related Story

- Advertisement -

राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर जास्त असून या जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यानुसार यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले.

या चारही जिल्ह्यांत सध्या कोरोना रुग्णसंख्या राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेमार्फत ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीवर अधिक भर दिला जात आहे. या चारही जिल्ह्यांत लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना नोडल अधिकार्‍यांना देण्यात आल्याचे टोपे म्हणाले.

- Advertisement -

कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर ज्या देशांमध्ये लसीकरण जास्त झाले तेथे तिसरी लाट आली तरी तिचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यामध्ये अधिकाधिक लसीकरण करण्यावर भर देण्यात येत असून अखंडितपणे लस पुरवठ्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे टोपे यांनी सांगितले.

झिका व्हायरसमुळे घाबरुन जाऊ नये
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये झिकाचा एक रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून तीन सदस्यांचे पथक पाहणीसाठी आले आहे. या भागात डास उत्पतीची ठिकाणे नष्ट करण्यावर भर देण्यात येत असून लक्षणानुसार उपचार केले जात आहे. या आजाराचे संक्रमण झाले नसून त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत उपाययोजना केल्या जात आहे. झिका वायरसमुळे घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले.

- Advertisement -