घरताज्या घडामोडीआमदार नितेश राणेंच्या आव्हानाला वैभव नाईकांचे प्रत्युत्तर, 'तो' व्हिडीओ केला व्हायरल

आमदार नितेश राणेंच्या आव्हानाला वैभव नाईकांचे प्रत्युत्तर, ‘तो’ व्हिडीओ केला व्हायरल

Subscribe

भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि आमदार वैभव नाईक यांना खुले आव्हान दिलं होते. यानंतर वैभव नाईक यांनी नितेश राणेंचे स्वीकारले आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर मुंबईत हल्ला झाल्यानंतर नितेश राणेंनी खुलं आव्हान दिलं होते. सिंधुदुर्गमध्ये शिवसेना नेत्यांनी संरक्षणाशिवाय फिरून दाखवावे असे आव्हान नितेश राणेंनी दिले होते. सिंधुदुर्गमध्ये वैभव नाईक आणि नितेश राणे यांच्यात नेहमीच वाद सुरु असतो. दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असतात. अशामध्ये नितेश राणेंनी दिलेल्या आव्हानाला वैभव नाईक यांनी कृतीमधून प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट राज्य सरकार आणि शिवसेनेला आव्हान दिलं होते. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नितेश राणे म्हणाले की, पोलिसांना २४ तास रजेवर पाठवा मग राज्यातील परिस्थिती कशी आटोक्यात आणतो ते पाहा, राणेंची असे आव्हानच दिले होते. तसेच सिंधुदुर्गातील शिवसेना आमदार वैभव नाईक यांना माहिती आहे की, मला राज्य सरकार आणि पोसिसांकडून कोणतेही संरक्षण नाही. मला महाविकास आघाडी सरकारचे संरक्षणही नको आहे. परंतु सिंधुदुर्गामधील नेत्यांनी पोलीस संरक्षणाशिवाय फिरतील का ? असा सवाल आणि एक प्रकारे आव्हान नितेश राणेंनी दिले होते.

- Advertisement -

वैभव नाईकांचे नितेश राणेंना उत्तर

शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणेंचे आव्हान स्वीकारुन एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. आमदार वैभव नाईक रोज सकाळी व्यायाम करण्यासाठी, नाष्टा करण्यासाठी किंवा इतर कामासाठी पोलीस संरक्षणाशिवाय फिरत असतात असे अनेकवेळा शिवसैनिकांकडून सांगण्यात येत होते. याबाबत एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. वैभव नाईक साध्या वेशात फिरताना दिसत आहेत. या व्हिडीओत वैभव नाईक यांच्यासोबत पोलीस संरक्षण नसल्याचे दिसत आहे.


हेही वाचा : माझा मनसुख हिरेन केला तरी माफिया सेनेचा अंत करणारच, सोमय्यांचा दिल्लीतून ठाकरे सरकारला इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -