घरमहाराष्ट्रवज्रमूठ सभा होणार पण...; उद्धव ठाकरेंनी दिले कारण

वज्रमूठ सभा होणार पण…; उद्धव ठाकरेंनी दिले कारण

Subscribe

महाविकास आघाडीच्या राज्यात तीन वज्रमूठ सभा झालेल्या आहेत. पण शरद पवारांच्या निर्णयानंतर या सभा होणार नाही अशी चर्चा करण्यात येत होती. पण आता याबाबत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदावरून निवृत्ती घेण्याची घोषणा शरद पवार (Sharad pawar) यांनी केली. त्यानंतर लगेच महाविकास आघाडीच्या उर्वरित वज्रमूठ सभा होणार नाही, अशी माहिती समोर आली. पण यावरून वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात होते. अवकाळी पावसामुळे सभांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. तर उन्हामुळे सभा पुढे ढकलण्यात आल्याचे कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून कारण देण्यात आले. पण याबाबत आता उद्धव ठाकरे यांनी सांगत कारण दिले आहे. आज (ता. 04 मे) उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

हेही वाचा – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मतदारांना उद्धव ठाकरेंनी दिला सल्ला

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या राज्यात तीन वज्रमूठ सभा झालेल्या आहेत. पण शरद पवारांच्या निर्णयानंतर या सभा होणार नाही अशी चर्चा करण्यात येत होती. पण आता याबाबत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. “वज्रमूठ” सभा मे महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा जूनपर्यंत घेण्याचे मीच ठरवले होते. पण उन्हाचा तडाखा पाहता या सभांची तारिख पुढे ढकलण्याची चर्चा सुरू आहे. कारण या सभा संध्याकाळी असल्यातरी लोक दुपारीच येऊन बसतात आणि खारघर येथे घडलेल्या घटनेनंकतर ते चुकीचे वाटत आहे. तसेच महाड येथील सभा एक महिन्यापूर्वीच ठरली होती, त्यामुळे मी तिथे जाणार आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरून बाजूला होण्याचा निर्णय शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतला. यानंतर महाविकास आघाडीच्या (MVA) उर्वरित चार सभा होणार नसून ‘वज्रमूठ’ (Vajramuth) सुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. या पार्श्वभूमीवर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, वज्रमूठ सभा संपल्या आहेत, असे गृहीत धरू नका.

- Advertisement -

प्रकल्पासाठी स्थानिकांवर जबरदस्ती नको…
बारसूमध्ये मी आमच्या लोकांना भेटायला जात आहोत. राज्यातील इतर प्रकल्प गुजरातला जात आहेत. पालघरमध्ये लोकांना घरात घुसून बाहेर काढलं असे म्हणत उध्दव ठाकरेंनी टीका केली. प्रकल्पासाठी स्थानिकांवर जबरदस्ती नको असे वक्तव्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

व्यक्तीचा नाही वृत्तीचा पराभव करायचा आहे
देशात हुकुमशाही येणार नाही असं मानणाऱ्या लोकांची एकता व्हायला हवी. व्यक्तीचा नाही वृत्तीचा पराभव करायचा आहे, हुकूमशाही वृत्तीला माझा विरोध आहे, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे हुकुमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं , असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -