Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : 'वंचित'ला 'मविआ'त मिळाले अधिकृत स्थान, प्रकाश आंबेडकरांना पाठवले पत्र

Maharashtra Politics : ‘वंचित’ला ‘मविआ’त मिळाले अधिकृत स्थान, प्रकाश आंबेडकरांना पाठवले पत्र

Subscribe

मविआच्या आजच्या बैठकीतील नाराजी नाट्यानंतर वंचितला मविआमध्ये अधिकृत स्थान देण्यात आले आहे. मविआने याबाबतचे पत्र वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पाठवले आहे.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आज (ता. 30 जानेवारी) मुंबईतील ट्रायडेंड हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेतेही सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडीला ही या बैठकीला बोलविण्यात आले होते. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे बैठकीला उपस्थित राहिले नाही. परंतु, वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे या बैठकीला उपस्थित राहिले होते. परंतु, या बैठकीत त्यांना तासाभरापेक्षा जास्त वेळ बाहेर बसवून ठेवण्यात आल्याने पुंडकर यांनी नाराजी व्यक्त करत बैठकीतून काढता पाय घेतला. पण यानंतर लगेच मविआने वंचितला अधिकृत स्थान त्याबाबतचे पत्र प्रकाश आंबेडकर यांना पाठवले आहे. (Vanchit Bahujan Aghadi got official position in Mahavikas Aghadi)

हेही वाचा… Maharashtra Politics : मविआच्या बैठकीत वंचितला अपमानास्पद वागणूक, प्रवक्ते पुंडकर संतापले

- Advertisement -

आम्ही महाविकास आघाडीचे घटकपक्ष आहोत की नाही? जर असू तर आम्हाला त्या प्रकारचे अधिकृत पत्र देण्यात यावे, अशी मागणी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पुंडकर यांनी केली होती. पण आम्ही सांगू असे म्हणत पुंडकरांना तासभर बाहेर ठेवण्यात आले. त्यामुळे पुंडकरांनी नाराज होत या बैठकीतून काढता पाय घेतला आणि प्रसार माध्यमांसमोर येत आम्हाला अपमानाची वागणूक मिळाल्याची माहिती दिली. ज्यानंतर महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नावे पत्र लिहित त्यांना मविआत अधिकृतरित्या सहभागी करून घेतले.

शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी हे पत्र त्यांच्या X या सोशल मीडियावरील अधिकृत अकाउंटवरून पोस्ट केले आहे. या पत्रात लिहिण्यात आले आहे की, “देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. 2024 साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे.” असे पत्राच्या सुरुवातीला लिहिण्यात आले आहे.

- Advertisement -

तर, “दि. 30 जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे.” असे लिहित वंचितची मागणी मविआकडून मान्य करण्यात आल्याचे या पत्राच्या माध्यमातून समोर आली आहे. ज्यामुळे आता महाविकास आघाडीच्या या अधिकृत भूमिकेवर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर नेमके काय म्हणतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -