घरमहाराष्ट्रकार-टँकरच्या भीषण अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याचा मृत्यू

कार-टँकरच्या भीषण अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याचा मृत्यू

Subscribe

औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ऑईल टँकरमध्ये भीषण अपघात झाला आहे. गेवराई शहराजवळ ही घटना घडली आहे. या भीषण अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याचा मृत्यू झाला आहे.

कार-टँकरच्या भीषण अपघातात वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हा अध्यक्ष सदाशिव भिंगे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदाशिव भिंगे यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला तर, एक जण जखमी झाला आहे. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहरालगत झमझम पेट्रोल पंपाजवळ गुरूवारी हा भीषण अपघात झाला.

- Advertisement -

हा अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा अक्षरश: चुराडा झाला. यामध्ये वंचितचे लातूर जिल्हा अध्यक्ष सदाशिव भिंगे आणि संतोष भिंगे यांचा जागेवरच तर व्यंकट सकटे, सदाशिव गर्दे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. राम भिंगे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एसटी बसला भीषण अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात एक जण ठार तर चालकासह १६ जण जखमी झालेत. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर मध्यरात्री दीड वाजता हा अपघात झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. साताऱ्यातून मुंबईकडे बस निघाली होती. जखमींवर कामोठे इथल्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -