घरताज्या घडामोडीवंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षासह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षासह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Subscribe

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पुण्यातील कसबा व चिंचवड पोटनिवडणूक २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रचार रॅली सुरू केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पुण्यातील कसबा व चिंचवड पोटनिवडणूक २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रचार रॅली सुरू केली आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी देवेंद्र तायडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. (vanchit city president devendra tayde and 100 vba office bearer join ncp presence in sharad pawar chinchwad bypoll election nana kate )

शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर “भाजपाकडून देशात हुकूमशाही आणण्याचे प्रयत्न सुरू असल्यामुळे भाजपाचा पराभव करणे ही काळाची गरज बनली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पूरक ठरणारी भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती”, असे देवेंद्र तायडे म्हणाले.

- Advertisement -

वंचित ही भाजपाची ‘बी’ टीम बनल्याचे सांगत देशातील लोकशाही वाचवायची असल्यास भाजपाला हद्दपार करावे लागेल. त्यामुळे वंचितमधून बाहेर पडत असल्याचे देवेंद्र तायडे यांनी सांगितले.

“भाजपच्या सत्ताकाळात देशातील वंचितांच्या शोषणाची परिसीमा गाठली आहे. त्यामुळे वंचित घटकाच्या संरक्षणासाठी भाजपाला मदत करणारी कोणतीही कृती टाळली पाहिजे, ही कार्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे”, असेही देवेंद्र तायडे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – 100 मोदी-शाह आले तरी 2024 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल – मल्लिकार्जुन खरगे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -