घरमहाराष्ट्रआताची सर्वात मोठी बातमी : 'वंचित'चा अजून महाविकास आघाडीत समावेश नाही, प्रकाश...

आताची सर्वात मोठी बातमी : ‘वंचित’चा अजून महाविकास आघाडीत समावेश नाही, प्रकाश आंबेडकरांची स्पष्टोक्ती

Subscribe

मविआच्या पत्रावर प्रश्न उपस्थित करत 'वंचित'चा अजून महाविकास आघाडीत समावेश नाही, असे प्रकाश आंबेडकरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अकोला : महाविकास आघाडीमध्ये वंचितला अधिकृत स्थान द्या, अशी मागणी काल (ता. 30 जानेवारी) वंचितचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली होती. मविआच्या बैठकीत झालेल्या नाराजी नाट्यानंतर काहीच वेळात मविआने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहित वंचितला मविआत अधिकृत स्थान दिले. पण या पत्रानंतर वंचितकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती. ज्यानंतर आज (ता. 31 जानेवारी) प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. मविआच्या पत्रावर प्रश्न उपस्थित करत ‘वंचित’चा अजून महाविकास आघाडीत समावेश नाही, असे प्रकाश आंबेडकरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (‘Vanchit’ is not yet included in Mahavikas Aghadi, Prakash Ambedkar’s candid words)

हेही वाचा… MVA seat sharing : मविआत अजूनही 8 जागांवर धुसफूस कायम, पण…

- Advertisement -

मविआने पाठवलेल्या पत्रावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अद्यापही महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला आहे, असे मानायचे नाही. वंचितला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचे असेल तर काँग्रेस पक्षाचे वरच्या नेतृत्वाने त्याला मान्यता दिली पाहिजे. एआयसीसीची आम्हाला मान्यता आहे की नाही, हेच आम्हाला माहीत नाही. त्यामुळे नाना पटोले फक्त पत्रव्यवहार करतात. पण आम्हाला सांगण्यात आले होते की, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण असून ते याबाबत निर्णय घेतील. पण त्या पत्रावर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची सही नाही, असे आंबेडकरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तर, आम्ही इगो करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली याचा बोभाटा करणार नाही. आम्ही जे आधीपासून सांगत आहोत की, हे भाजपाचे शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा विरोध करत आहोत. तेव्हा आपला इगो की आरएसएस-भाजपाचे सरकार न येणे याचा विचार केला तर आम्ही आरएसएस-भाजपाचे सरकार न येणे, याला प्राधान्य देऊ, असे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. ज्यामुळे आता महाविकास आघाडीकडून जरी वंचितला अधिकृत स्थान देण्यात आले असली तरी प्रकाश आंबेडकरांनी अद्यापही ते स्वीकारले नाही, असे स्पष्टरित्या सांगितले आहे. परंतु, 2 फेब्रुवारीला होणाऱ्या मविआच्या बैठकीला वंचित उपस्थित राहणार आहे. तर त्यानंतरच सर्व सविस्तर चर्चा करून वंचितकडून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेच पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -