घरताज्या घडामोडीकोकणात वंदे भारत एक्स्प्रेसला आज पंतप्रधानांकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता, चाचणी यशस्वी

कोकणात वंदे भारत एक्स्प्रेसला आज पंतप्रधानांकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता, चाचणी यशस्वी

Subscribe

कोकण रेल्वेमार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसची मंगळवारी पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पडली. या एक्स्प्रेसने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव (गोवा) हे अंतर केवळ ६ तास ५७ मिनिटांत पार केले तर, मुंबई ते रत्नागिरी हे अंतर कापण्यासाठी या एक्स्प्रेसने अवघा ४ तास २७ मिनिटांचा कालावधी घेतला. मात्र, या यशस्वी चाचणीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ही एक्स्प्रेस केवळ ७ तासांत मुंबई ते गोवा हे अंतर कापणार आहे.

मुंबईवरून सकाळी ५ वाजून ५३ मिनिटांनी सुटलेल्या या हाय स्पीड एक्स्प्रेसने एकूण ५८१ किलोमीटरचे अंतर सुमारे ७ तासांत पूर्ण केले आहे. ही चाचणी अनुभवण्यासाठी विविध ठिकाणातील रुळांजवळ अनेक स्थानिकांनी गर्दी केली होती. अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात या चाचणीचे क्षण टिपले. मात्र, ही पहिली चाचणी यशस्वी झाल्यानंतर या मार्गावर आणखीन दोन ते तीन चाचण्या घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

या चाचण्यांच्या यशानंतर मुंबईतून चिपळूण, रत्नागिरी तसेच गोव्याकडे वातानुकूलित आणि अतिजलद अशा वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवाशांना अनुभव घेता येणार आहे. या गाडीमुळे कोकणातील पर्यटनालाही मोठा फायदा होणार आहे.


हेही वाचा : कोकणवासीयांसाठी खुशखबर! कोकण रेल्वेमार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी यशस्वी, ७ तासांत प्रवास शक्य

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -