घर महाराष्ट्र खुशखबर : Vande Bharat उद्यापासून चाकरमान्यांच्या सेवेत; पहाटे ५.२५ सुरू होणार प्रवास

खुशखबर : Vande Bharat उद्यापासून चाकरमान्यांच्या सेवेत; पहाटे ५.२५ सुरू होणार प्रवास

Subscribe

मुंबईः ओडिशातील भीषण रेल्वे दुर्घटनेमुळे सुरु न झालेली मुंबई-गोवा Vande Bharat ट्रेन उद्यापासून चाकरमान्यांच्या सेवेत रुजू होणार आहे, अशी माहिती रेल्वेने दिली. कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाडगे यांनी ही माहिती दिली. सोमावरी ५ जूनपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव Vande Bharat ट्रेन सुरु होणार आहे. त्यामुळे वंदे भारतने अगदी कमी वेळेत कोकणात जाता येणार आहे. मुंबई ते गोवा हे अंतरही कमी वेळेत पूर्ण करता येणार आहे.

हेही वाचाःOdisha Train Accident : ‘या’ कारणामुळे ओडिशात घडला रेल्वे अपघात; चौकशीतून कारण आले समोर

- Advertisement -

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या Vande Bharat एक्स्प्रेसचे लोकार्पण शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. परंतु ओडिशातील (Odisha) एक्स्प्रेस दुर्घटनेमुळे वंदे भारतचा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला. वंदे भारत’ एक्स्प्रेसला व्हिडीओ कॉन्फरन्सींच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे हिरवा कंदील दाखवणार होते. तसेच मडगाव रेल्वे स्थानकावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार होता. परंतु ओडिशातील एक्स्प्रेस दुर्घटनेमुळे ‘वंदे भारत’चा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला. त्यामुळे कोकणातील वंदे भारत कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. वंदे भारतची प्रतिक्षा संपली असून उद्या सोमवारी ही हायस्पीड ट्रेन चाकरमान्यांच्या सेवेत दाखल होईल.

वंदे भारतला कणकवलीत थांबा

दे भारत ट्रेनला कणकवली स्थानकावर थांबा देण्यात यावा, यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संभ्रम असलेल्या या गोष्टीबाबत आता स्पष्टता मिळाली असून वंदे भारत ट्रेनला कणकवलीत थांबा देण्यात आलेला आहे. वंदे भारत ट्रेनला कणकवली रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, अशी गेल्या कित्येक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती. तर आमदार नितेश राणे हे या मागणीचा सतत पाठपुरावा करत होते. त्यामुळे त्यांच्या या मागणीला यश आले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. कणकवली स्थानकात या ट्रेनला थांबा देण्यात येणार असल्याने याचा मोठा फायदा गणपतीमध्ये होणार आहे. तर या निर्णयामुळे कोकणवासीयांची गणपतीवारी आणखी सुखकर होणार असल्याचे बोलले जात आहे.

असे आहे वेळापत्रक

- Advertisement -

5 जूनपासून ही वंदे भारत एक्स्प्रेस नियमितपणे मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन पहाटे 5.35 वाजता सुटेल आणि गोव्यातील मडगावला दुपारी 1.25 वाजता पोहोचेल. ही ट्रेन सकाळी ठाण्यात सकाळी 6.05 वाजता, पनवेल येथे 6.40 वाजता, खेड येथे 8.40 वाजता, रत्नागिरी स्थानकावर 10.00 वाजता आणि कणकवली येथे ही गाडी 11.20 वाजता पोहोचेल, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तर मडगावमध्ये दुपारी 1.25 मिनिटांनी ही गाडी पोहोचेल. मडगाव येथून वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 2.35 वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात रत्नागिरीतील तिची वेळ 5.35वाजताची असेल. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री 10.35 वाजता पोहोचेल. तसेच परतीच्या मार्गावर मडगाव येथून सुटल्यावर मुंबईकडे जाताना कणकवली येथे 4.10 मिनिटांनी पोहोचेल. तसेच रायगड जिल्ह्यात रोहा आणि पनवेल येथे थांबा देण्यात आला आहे. मडगावकडून मुंबईच्या दिशेने जात असताना रोहा येथे रात्री 8.05 वाजता तर पनवेल येथे 9.18 वाजता आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री 10.35 वाजता पोहोचेल.

 

- Advertisment -