घरमहाराष्ट्रVande Bharat : ...त्यांचे काय करायचे? सचिन सावंत यांचा भाजपावर पलटवार

Vande Bharat : …त्यांचे काय करायचे? सचिन सावंत यांचा भाजपावर पलटवार

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांनी अलीकडेच वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास केला होता. त्यांचा फोटो शेअर करत भाजपाने टीका केली होती. त्याला आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – Modi Govt : जुन्या घोषणा कागदावरच अन् नवनवीन घोषणांची ‘गॅरंटी’, ठाकरे गटाचा हल्लाबोल

- Advertisement -

कोकणदौरा आटोपल्यानंतर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी वंदे भारत ट्रेनमधून खेडहून मुंबई असा प्रवास केला होता. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे दाम्पत्यावर टीका केली होती. कोकण दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर येथेच्छ टीका करून मोदी गॅरंटीद्वारे तयार झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बसून मुंबईला आले, हेच मोदी यांचे यश असल्याचे त्यांनी म्हटले होते. याला ठाकरे गटाने प्रत्युत्तर दिले होते. माझ्यासाहित मुख्यमंत्री शिंदे यांना देखील पोलियो डोस काँग्रेस सरकारच्या कालखंडात दिले गेले. मग तो डोस काँग्रेसने किंवा तेव्हाच्या पंतप्रधानांनी दिलेला होता का? वंदे भारत, राम मंदिर या दोन गोष्टी देशातील जनतेच्या कष्टाचे पै पै जमवून झालेल्या आहेत. महाशक्तीच्या खिशातील पैशाने नाही, हे लक्षात ठेवा, असा पलटवार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

- Advertisement -

तर, याच मुद्द्यावरून भाजपा आणि ठाकरे गटात देखील ट्विटरवॉर रंगले होते. महाराष्ट्र भाजपाने हा फोटो ट्वीट करत, हीच तर मोदी की गॅरंटी आहे. कुठे आहे विकास? म्हणून ओरडणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करून लाभार्थी होतात, तेव्हा समाधान वाटते, असा टोला लगावला होता.

हेही वाचा – Sanjay Raut : “मोदी-शहा महाराष्ट्राचे गुन्हेगार” संजय राऊतांची घणाघाती टीका

आता या वादात काँग्रेसनेही उडी घेतली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी याबाबत ट्वीट केले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करून लाभार्थी होतात, याचे भाजपाला समाधान वाटत असले तरी, वंदे भारत ज्या ट्रॅकवरून चालते ते काँग्रेस सरकारच्या काळातील आहेत त्यांचे काय करायचे? असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.

हेही वाचा – Nana Patole: राज्यकर्त्यांसोबत गुंड फिरतात, हे गुंडांचं सरकार आहे का? नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -