घरताज्या घडामोडीरायगड जिल्ह्यातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

रायगड जिल्ह्यातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत उरण, खारघर आणि उलवेमधील विविध पक्षातील नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. खारघरमधील डॉ. विजयकुमार चव्हाण (रुईया कॉलेजचे प्राध्यापक), एचपीसीएलचे महाव्यवस्थापक दौलत एच. काटकर, सत्र न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश डॉ. संतोषकुमार जैस्वाल आणि बँक, एलआयसी, बीआरसी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक निवृत्त अधिकाऱ्यांनी यावेळी पक्षात प्रवेश केला.

तर उरण तालुक्यातील मनसेचे वाहतूक सेना रायगड जिल्हा संघटक प्रकाश काशिनाथ म्हात्रे, शेकापचे नवघर विभाग अध्यक्ष संजय तांडेल, प्रीतम ठाकूर, सुशांत पाटील, पंकेश पाटील आदींसहीत मनसेच्या अनेक युवा कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. उलवे नोडमधून युवा कार्यकर्ते नितेश हाडवळे, मनसे विभाग उपाध्यक्ष श्रीमंत घरत, परवेज मुजावर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

- Advertisement -

उरण-पनवेल शहरात गेल्या काही दिवसापासून जोरदार इनकमिंग सुरु आहे. थोड्या काळातच याभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक एकचा पक्ष होईल असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी बोलताना व्यक्त केला. आज विविध क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्वांचा पक्षात प्रवेश होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून ते युवक कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जवळचा वाटतोय. नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात क्रमांक १ चा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आला आहे. त्यामुळे आगामी काळात रायगडमधील विविध मनपा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तम कामगिरी करेल अशी आशा खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली.

सत्ता आहे म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश होत नाहीयेत. तर सत्तेत राहून लोकांची कामे चांगल्या पद्धतीने करत असल्यामुळेच विविध क्षेत्रातील लोक राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे रुपालीताई चाकणकर यावेळी म्हणाल्या. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, पनवेलचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सौ. भावनाताई घाणेकर, प्रदेश सचिव सुदाम पाटील, महिला जिल्हाध्यक्षा नेहा पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा : Unemployment in India: देशात बेरोजगारीची लाट, ५ कोटींहून अधिक तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -