घरताज्या घडामोडीदहावीच्या निकालावेळी आलेल्या तांत्रिक बिघाडीवर चौकशी होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती

दहावीच्या निकालावेळी आलेल्या तांत्रिक बिघाडीवर चौकशी होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती

Subscribe

दहावीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट हळू हळू पुर्ववत आणण्यात येईल आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर चौकशी करुन कारवाई करण्यात येणार

राज्यातील महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शुक्रवारी १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. परंतु सर्व विद्यार्थ्यांनी एकाच वेळी निकाल पाहण्याचा प्रयत्न केल्यामुळे वेबसाईटवर लोड झाला अन वेबसाईट क्रॅश झाली होती. निकाल लागल्यापासून ६ ते ७ तास विद्यार्थ्यी निकाल पाहण्याच्या प्रतिक्षेत होते. लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालकांना ६ तास झाले तरी निकाल पाहता आला नाही यामुळे त्यांच्यात प्रचंड संताप पसरला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणावर माफी मागत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिलं आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, दहावीचे वर्ष सगळ्यांच्या जीवनातील खुप महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे सगळे जण मोठ्या प्रमाणात निकला पाहण्यासाठी उत्सुक होतात. आज १६ जुलैला माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत निकाल लागणार होता. निकाल लागताच सर्वच विद्यार्थ्यांनी एकाच वेळी वेबसाईटवर निकाल पाहिल्यामुळे वेबसाईटवर लोड झाला आणि तांत्रिक बिघाड झाला. तांत्रिक बिघाडामुळे सगळ्यांना निकाल पाहता आला नाही. त्याबद्दल सगळ्यांची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माफी मागितली आहे.

- Advertisement -

दहावीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट हळू हळू पुर्ववत आणण्यात येईल आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. मुलांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. निकालाची पुर्व तयारी करण्याची गरज होती परंतु बिघाडाची चौकशी करुन कारवाई करण्यात येणारे आहे जेणेकरुन पुढील काळात अशी पुनरावृत्ती होणार नाही. असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२१ चा निकाल पाहण्यासाठी शासनाकडून नव्या दोन वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वेबसाईटवर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकणार आहेत. https://bit.ly/3wKCf2c आणि https://bit.ly/3BbB0MT ह्या दोन नव्या वेबसाईट तब्बल ७ तासानंतर देण्यात आल्या आहेत. अजूनही काही विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत असून वारंवार लिंक चेक करत आहेत. परंतु त्यांनाही वेबसाईटवर एरर दाखवण्यात येत आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -